
बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
शिरसाटवाडी ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभ रविवार दि. 21 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वा. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील तसेच पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे माजी सभापती प्रवीण माने यांच्या शुभहस्ते आणि निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार यांच्या अध्यक्षस्थानी उद्घाटन समारंभ होणार आहे.
या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या भारती मोहन दुधाळ ,माजी पंचायत समिती सदस्या सुवर्णा गोविंद रणवरे , विकास सेवा सोसायटीचे चेअरमन भागवत शिंगाडे , व्हाईस चेअरमन पोपट डांगे , शिरसटवाडी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रवींद्र डांगे हे या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
शिरसाटवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी सायंकाळी 7 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
शिरसटवाडी ग्रामपंचायतचे सरपंच जयकुमार रावण , उपसरपंच चंद्रशेखर शिरसट ,ग्रामसेवक लक्ष्मीकांत जगताप तसेच ग्रामपंचायत सदस्य फिरोज पठाण , अशोक जगताप , महेश पवार ,सुनंदा दशरथ नागाळे यांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे यावेळी आवाहन केले आहे.