
सैय्यद ज़ाकिर
जिल्हा प्रतिनिधी वर्धा
हिंगणघाट :- समता मैदान पंचशील नगर,काज़ी वार्ड हिंगणघाट येथे विश्वभूषण प.पु.डॉ.बाबासाहेब आम्बेडकर जयंती निमित मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते.
मीटिंगचे अध्य्क्ष म्हणून उध्दव धाबर्डे (माजी सैनिक) हे होते तर मीटिंगला प्रमुख उपस्थितांमध्ये अशोक रामटेके,मंगला कांबडे मॅडम,सुनील तेलतुंबड़े,गोराखताथ आदी उपस्थित होते.
मीटिंग मध्ये महत्वाचे विषय घेण्यात आले
विशेष :- (१) विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आम्बेडकर जयंती उत्सव समिति 2023 द्वारे घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे हिशोब सादर करने व आयोजित कार्यक्रमाची समीक्षा करणे.
विषय:- (२) नुसार या वर्षी 14 एप्रिल 2024 ला डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा करण्याच्या दृष्टिने विचार विनिमय करण्यात आले व या विषया वरती सकारात्मक चर्चा करण्यात आली….
विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती 2024 ची कार्यकारणी गठीत करण्यात आली.सदर बैठकी अंतर्गत सर्वानुमते अध्यक्ष म्हणून विजयभाऊ तांमगाडगे यांची नियुक्ति करण्यात आली आहे.उर्वरित समितीचे गठण विजयभाऊ तांमगाडगे यांच्या अध्यक्षते खाली होणार आहे.
मीटिंगमध्ये मोठ्या संख्येने हिंगणघाट मधील नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय धाबर्डे यांनी केले व शेवटी बैठकीची सांगता विक्रांतभाऊ भगत यांनी आभार प्रदर्शन करुन केली.