
आप्तेष्ट आणि अतिथी त्याचे समर्थन करू लागले तर त्याचा काही उपयोग होईल का?
— नाही! तिळमात्रही नाही.
— किंवा जर त्याचे भूत- पितर देवदेवतांसाठी किंवा राजासाठी त्याने हे केले असे समर्थन करू लागले तर ते चालेल काय?’
— नाही!तिळमात्रही चालणार नाही.
— तो किंवा इतर लोक त्याने केलेले सदाचरणाचे आणि न्यायाचे उल्लंघन हे सर्व आम्हाला अन्न आणि पेय मिळवून देण्यापायी केले असे समर्थन करू लागले तर त्याचा काही उपयोग होईल का?
— ” नाही!”
— ” सारिपुत्त:जो आपल्या आईबापासाठी न्याय आणि सदाचरणाचे उल्लंघन करतो, आणि जो कसलीही वेळ आली तरी न्याय आणि सदाचरणाचा मार्ग सोडीत नाही, यापैकी धनंजानी, कोणता मनुष्य अधिक चांगला ठरतो? “
— धनंजानीने उत्तर दिले, “दुसऱ्या प्रकारचा.कारण न्याय आणि सदाचरणाने वागणे हे अर्थात त्याच्या उल्लंघनापेक्षा श्रेयस्कर आहे.”
— ” धनंजानी,आपल्या आईबापांचे पोषण करण्याचे न्याय आणि सदाचरणाचे असे दुसरे मार्ग आहेत.त्यासाठी दुष्कृत्ये करण्याची आवश्यकता नाही आणि हे मार्ग पत्नी, कुटुंब आणि इतर सर्वांच्याही परिपोषणाला मोकळे नाहीत का? ” सारिपुत्ताने विचारले.
— धनंजानी :सारिपुत्ता ते मार्ग मोकळे आहेत.
— त्यानंतर सारिपुत्ताच्या या भाषणाने प्रसन्न होऊन त्याचे आभार मानून धनंजानी उठला आणि आपल्या गृही परत गेला.
***
( संदर्भ-भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, लेखक- डॉ.बाबासाहेब आंबेडकर, पान नं.२९८.)
(भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म – नं.१४६.)
***