तिन महिने उलटल्यानंतरही कंत्राटी शिक्षक मानधनापासुन वंचीत…  — घर भाडे द्यायचे कसे? खायचे काय? उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर…  — कंत्राटी शिक्षकांचे रखडलेले मानधन तातडीने देण्यात यावे याकरिता अतिरिक्त जिल्हा कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन….

प्रदीप रामटेके  

मुख्य संपादक 

             आदिवासी बाहुल्य गडचिरोली जिल्ह्यात माहे सप्टेंबर २०२४ मध्ये पेसा अंतर्गत कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती मानधन तत्वावर करण्यात आली आहे. 

           मात्र,रुजू झाल्यापासून तिन महीने उलटल्यानंतर सुध्दा अद्यापही कंत्राटी शिक्षकांना मानधन देण्यात आले नाही.यामुळे पेसा अंतर्गत अती दुर्गम भागात काम करणा-या कंत्राटी शिक्षकांना कौटुंबिक समस्येला सामोरे जावे लागत असुन उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

            पेसा अंतर्गत स्थानिक पातळीवर कंत्राटी शिक्षक भरती करण्यात आली असली तरी अनेकांना अतिदुर्गम भागात खुप लांबच्या ठिकाणी नियुक्ती देण्यात आली आहे.

         तुटपुंज्या मानधनात येन्याजान्याचा खर्च परवडणारा नसल्याने अनेक कंत्राटी शिक्षक परीवारापासुन दुर भाड्याच्या खोलीत राहत आहेत व दुर्गम भागात सेवा देण्याचे काम निसंकोचपणे पार पाडत आहेत. 

        पण तीन महिन्यांपासून मानधनच न मिळाल्याने घर भाडे द्यायचे कसे? खायचे काय? असे अनेक अनुत्तरीत सवाल कंत्राटी शिक्षकासमोर आवासून उभे ठाकले आहेत. 

               कंत्राटी शिक्षकांची मानधन बाबत गंभीर बाब लक्षात घेऊन स्थानिक जिल्हा प्रशासनाने संबधीत विभागाकडे पाठपुरावा करुन पेसा अंतर्गत कंत्राटी शिक्षकाचे तीन महिन्याचे मानधन तातडीन देण्यात यावे अशी त्यांची न्याय पुर्वक मागणी आहे.

        तद्वतच दर महिन्याच्या ५ तारखेच्या आत मानधन देण्यात यावे अशी रास्त मागणी पेसा अंतर्गत कंत्राटी शिक्षक-शिक्षिकांनी निवेदनातून केली आहे. 

          प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांना मानधन संदर्भात निवेदन देते वेळी पेसा अंतर्गत अनेक कंत्राटी शिक्षक-शिक्षिका प्रामुख्याने उपस्थित होते.