युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
वंचित बहुजन आघाडी अमरावती जिल्हा प्रमुख संजय चौरपगार यांचे नेतृत्वात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा दि 19 डिसेंबरला दर्यापूर येथिल शिवाजी चौकात जाहीर निषेध करण्यात आला.
18 डिसेंबरला अमित शहा यांनी सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपमानास्पद भाषेचा वापर केला त्याबद्दल अमित शहा यांनी माफी मागावी.महापुरुष किंवा संविधान यांच्या बद्दल असे विधान करू नये अशा घोषणा वंचित बहुजन आघाडी अमरावती जिल्हा पश्चिम तर्फे करण्यात आल्या अन्यथा वंचित बहुजन आघाडी या पेक्षाही तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा शासनाला देण्यात आला.
आंदोलन करतेवेळी संजय चौरपगार जिल्हा प्रमुख अमरावती, अशोक दुधंडे सचिव अमरावती अंकुश वाकपांजर, सुरेंद्र तायडे तालुकाप्रमुख दर्यापूर, सुरेश वाकपांजर तालुका उपप्रमुख, भिमराव कुऱ्हाडे,रामदास गावंडे, दिपक गवई, सुरेश चौरपगार, प्रभाकर चौरपगार, लक्ष्मण उमाळे, दिनेश तायडे, विनोद सोनवणे, देवानंद धांदे, धनकुमार डोके, संदीप चौरपगार, मंगेश ढोके, प्रदीप वानखडे, मेघा जाधव, सूर्यदास जामनिक, अण्णा आठवले, सवि आठवले, आशिष वानखडे, गौरव इंगळे, मंगेश वानखडे, पंकज वाकोडे, मिथुन सावळे, मयूर गवई, रवि कोकाटे, मंगेश वाकपांजर, कमल किशोर वाकपांजर, आशिष गावंडे, आनंदवर्धन अडीकने, सुनील वाकपांजर, व इतर पदाधिकारी उपस्थित होते.