शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
ईव्हीएम मशीन द्वारे होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांवर मतदारांचा भरोसा राहिलेला नाही.ईव्हिएम मशीन मध्ये मतांची हेराफेरी करून घोटाळे केले जातात याची खात्री मतदारांना आणि पक्ष प्रमुखांना,पक्ष उमेदवारांना,पक्ष पदाधिकाऱ्यांना,पक्ष कार्यकर्त्यांना झाली आहे.
यामुळे ईव्हीएम मशीन एवजी मतपत्रिकांद्वारे सार्वत्रिक निवडणुका घेण्यात याव्यात यासाठी चिमूर विधानसभा मतदारसंघातंर्गत राष्ट्रीय काँग्रेस पक्षा द्वारे स्वाक्षरी अभियानाला सुरुवात झाली आहे.
वरिष्ठांच्या आदेशानुसार राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे चंद्रपूर जिल्हा महासचिव गजानन बुटके,चिमूर तालुका अध्यक्ष डॉ.विजय गावंडे,भिसी येथील जेष्ठ कार्यकर्ता मुंगले,आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली स्वाक्षरी अभियान यशस्वी केले जात आहे.