मुरुमगाव यथे शॉट सक्रिटने घरात लागली आग… — लाखोचे नुकसान…

भाविकदास करमनकर 

  धानोरा तालुका प्रतिनिधी 

        धानोरा तालुक्यातील मुरुमगाव येथील निवासी गौराम दूकालूराम चिराम यांचे राहते घरात आज दिनांक 19/12/2024 रोज गुरूवार ला ठिक 12:00 वाजता अचानक शॉट सक्रिट होउन घरात पेटली असता घरातील पलगं,गाद्या घरातील सर्व कपडे,,दोन टीवी,आणी गादयाचा खालती जपून ठेवण्यात आलेली एकूण 90000-/ रुपये रोख रक्कम व शासकीय आवश्यक कागद पत्र जळून खाक झाले!

                 गौराम दूकालूराम चिराम वय 48, सौ.कूनतीबाई गौराम चिराम वय 40, मूलगी शुभांगी गौराम चिराम वय 26, मुलगा रितेश गौराम चिराम वय 23, मूलगा राकेश गौराम चिराम वय 21 हे सर्व शेतात काम करीत असून लहान मूलगा जेवण करण्या करीता घरी आल्यावर त्याला आपल्या घरात आग लागल्याचे दिसल्यावर लगेच शेजारी लोकांना आग विझवण्यात करीता बोलविले आणी आग विझवण्यात आले पण तो पर्यंत लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान झालेला होता.

          लहान मूलगा राकेश याने फोन करून आई वडील यांना आगीची माहिती दिली आणी गावातील पोलीस पाटील चंद्रशेखर ओरमडीया यांनाही माहिती दिली त्यांनी लगेच पंचनामा करून मूरूमगाव पोलीस यांना कळविले.

                  मुरुमगाव पोलीस ने सदर घटनेचा पंचनामा केला व विद्युत वितरण उपकेंद्र मुरुमगाव येथील कर्मचाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली आहे व त्याच बरोबर राजस्व विभागातील सबंधित तलाठी यांनी स्पॉट पंचनामा केला त्याच प्रमाणेच मौजा मूरूमगाव येथील ग्रामपंचायत पदाधिकाऱी सरपंच शिवप्रसाद गवरना व त्याचे ग्रामपंचायतचे सहयोगी पदाधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आले.

                 सदर व्यक्ती गौराम दूकालूराम चिराम यांनी शासना तर्फे संबंधित विभागा कडून आपल्याला नुकसान भरपाई देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे व त्याच प्रमाणे या घटनेत वित्त हानी मोठया प्रमाणात झाली पण प्राणहानी झाली नाही.