उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
कुमार लखन अंबादास पोईनकरचा अपघातातंर्गत मृत्यू गंभीर घटनाक्रमाकडे वळण घेत असताना चिमूर पोलिसांचा तपास थंडबस्त्यात का म्हणून आहे? योग्य दिशेने तपास करण्यासाठी ते का म्हणून पुढे येत नाही? हा प्रश्न त्यांच्यावर अनेक शंका निर्माण करणारा आहे.
१७ डिसेंबरला सकाळीच वाळू भरून असलेल्या ट्रॅक्टरटाली वरुन खाली पडल्याने कुमार लखन अंबादास पोईनकर यांचा मृत्यू झाला.कुमार लखन ट्रॅक्टर टालीच्या मागच्या चक्क्यात दबल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
वाळू चोरीचे राज उघड होईल म्हणून अपघात घटनास्थळ जाणिवपूर्वक मालक,चालक व मजूरांद्वारे सांगण्यात आले नाही.
घटनास्थळावरून मृतदेह हलविण्यात आला व वाळू अज्ञात स्थळी टाकण्यात आली.वाळू भरलेली ट्रक्टरटाली खाली केल्यानंतर ती धुण्यासाठी चिखलीच्या तलावात नेली व ट्रॅक्टर टालीच्या चक्याला लागलेले कुमार लखन अंबादास पोईनकर यांचे रक्त व मास साफ करण्यात आले असल्याचा गंभीर आरोप मोठा भाऊ देवानंद अंबादास पोईनकर यांचा आहे.
अपघात करणारी ट्रॅक्टरटाली जप्त न करणे,ट्रॅक्टर मालक सुमीत पालकदास बोरकर,ट्रॅक्टर चालक चंद्रशेखर नारायण तुमराम आणि मजूरांना ताब्यात अजूनपर्यंत न घेणे,हा पोलिसांचा कार्यभाग शंका निर्माण करतो आहे.
कुमार लखन अंबादास पोईनकर यांचा अपघात मृत्यू घटनाक्रम व वाळू चोरीचा प्रकार दाबण्यामध्ये चिमूर पोलिसांना स्वारस्य का म्हणून आहे?अशी चर्चा आता जनमानसात सुरू झाली आहे.
यामुळे चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी,कुमार लखन अंबादास पोईनकर यांच्या अपघात प्रकरणाकडे लक्ष द्यायला पाहिजे,असेही लोक मत आहे.