या देशाचा मालक मी (प्रत्येक भारतीय नागरिक),मग या व्यवस्थेचा गुलाम का होऊ?

 आम्ही भारताचे लोक…..

      स्वतःप्रत अधिनियमित करुन अंगीकृत करत आहोत…

       असे असतांना,हे राजकीय नेते आणि पक्ष जे अनितीमान आणि भ्रष्ट आहेत,ते आमचे गुलाम असतांना लोकशाहीत आम्ही त्यांचे गुलाम कसे?

       त्याचप्रमाणे येथील न्यायव्यवस्था,संसद,राष्ट्रपती, पोलीसप्रशासन,सर्वच प्रशासकीय व्यवस्था आमच्यासाठी निर्माण झालेले आहेत.त्यांच्यासाठी आपण नाही तर आपल्यासाठी ते निर्माण झालेले आहेत….

      हे प्रश्न स्वतःला विचारणे आणि कांही क्षण विचार करणे….

     म्हणजे हीच खरी संविधानाची शक्ती आहे…

     अरे या संविधानाने तर मला पूर्ण स्वातंत्र्य दिलेलेच आहे.

        मी माझ्या घरात श्रद्धा,पूजा,उपासना,करुन माझ्या धर्माच्या शिकवणुकीप्रमाणे माणूस म्हणून घडवण्यासाठीचे पूर्ण स्वातंत्र्य दिलेलेच आहे.

       शिवाय माझ्याच प्रयत्नातून निर्माण झालेल्या सार्वजनिक मंदिर, मजीद,विहार,चर्च,गुरुद्वाऱ्यात जाण्याची,तिथे जाऊन आपापल्या धर्माच्या सुसंस्कारानुसार सार्वजनिक समस्या सोडविण्याचे,एकमेकांच्या सुख – दुःखात सामील होण्याचे,माणूस म्हणून बनण्यासाठीचे जे जे स्पीडब्रेकर नष्ट करण्याचे प्रयत्न करण्याचे आणि माझ्या धर्मापेक्षाही महान असलेल्या मानवता धर्माचे….

( जो विज्ञानवादी + विवेकवादी = मानवतावादी आहे )

       पाईक होण्याची संधी मला संविधान उपलब्ध करुन देत असेल तर मी माझ्या धर्माच्या जिन्यातील पायऱ्यातून वरच्या मजल्यातील मानवता धर्माकडे जाण्याचा प्रयत्न का करू नये. जो धर्म केवळ आणि केवळ माणूसच बनण्याचे धडे शिकवतो.

      एक वेळ देव आणि राक्षस बनणे खूप सोपे आहे.

परंतू….

माणूस बनणे अशक्य नाही,पण महाकाठीण आहे!

        आणि हे महाकठीण काम शक्य करण्यासाठी कोणत्याही शाळेतील,महाविद्यालयातील किंवा विद्यापीठातील प्रमाणपत्राची अथवा डिग्रीची आवश्यकता अजिबात नाही.

तर…

संत कबीर….

संत गाडगे बाबा…

यांच्या सारख्यांच्या शेकडो संतांच्या…

      विनाभिंतीच्या चालत्या बोलत्या विद्यापीठाचे विद्यार्थी व्हावे लागते!

        आणि हे संपूर्ण स्वातंत्र्य मला ( प्रत्येक भारतीय नागरिकाला ) संविधानाने प्रदान केलेले असतांना.मी त्यातील अनेक संविधानाच्या तळाशी असलेले मोती मी का शोधू नये.अनंत भवरे सारख्याच्या सांगण्यावरून विश्वास का ठेऊ?

         मी जर स्वतः त्या संविधानाचा अभ्यास करुन अजून सुखी जीवन जगण्याची जास्त संधी मिळत असेल तर मी अनंत भवरे सारख्याच्या पेक्षा जास्त संविधानातील सुखाचे मोती शोधून मी त्याच्यापेक्षाही जास्त सुखी का होऊ शकत नाही…

      हा विचार मी करुन तशी कृती करुन जागृत होण्याचा संधीचा लाभ घेणे हीच खरी संविधानाची शक्ती आहे..

        या बौद्ध समाजाने जेवढा संविधानाचा अभ्यास करुन त्याला समजून घेऊन,त्यातील नियमांचे पालन करुन,त्याचा प्रचार प्रसार करुन,जेवढे जागृत झाले.म्हणूनच तर ते पुढे गेले…

       हे संविधान काय त्यांच्या एकट्याच्या बापाचे आहे काय?

        असं म्हणतात की या संविधानातून मानवी हक्काचे मूल्ये युनोनी आपल्या मानवी हक्काच्या जाहीरनाम्यात 30 कलमे निर्माण करताना भारताच्या संविधानाचा आधार घेतलेला आहे..

 असे असेल तर…..

     आणि माझ्या पारिवारिक, सामाजिक, राष्ट्रीयच नव्हे तर संपूर्ण सजीवसृष्टीच्या समस्येचे निराकरणच त्यात असेल तर मी या आंबेडकरवादी किंवा बौध्द समाजापेक्षाही जास्त आणि माझ्या धर्माच्या पेक्षाही जास्त अभ्यास….

  या केवळ माझ्यासाठीच 75 वर्षांपूर्वी बनलेल्या..

    “भारताच्या संविधानाचा, अभ्यास मी स्वतः करुन 100% समजून घेऊन सर्वापेक्षा मीच सुखी होण्यासाठी आज,आता,ताबडतोब पासून प्रयत्न करिन आणि मीच प्रथम सुखी होईल.

       आणि हे जे काही लोकं म्हणतात ना EVM हटाव देश बचाव,EVM हटाव संविधान बचाव,EVM हटाव लोकशाही बचाव,तुम्ही एकटेच बोंबलून काय होणार आहे?

    संविधानाने दिलेला मूलभूत हक्क वगैरे वगैरे.यांच्या सांगण्यावरून मी का जागृत होऊ?

       अरे मी ( प्रत्येक भारतीय नागरिक ) तुमच्यापेक्षाही जास्त संविधानाचा अभ्यास आज,आता,ताबडतोब पासून सुरुवात करुन येत्या काही दिवसात खरोखरच या EVM ने माझ्या मताचा अधिकार हिरावून घेतला असेल ना….

      जो माझ्या जिवापेक्षाही मोलाचा आहे असं म्हणतात ना…

      ज्यामुळे पाच वर्षानंतर सरकार बदलण्याची शक्ती आहे म्हणतात ना….

     जी संधी मला केवळ पाच वर्षातून एकदाच मिळते ना….

  ज्या मूलभूत्त हक्कामध्ये या खासदार आमदाराचे वेसन माझ्या हातात आहे ना?….

“तो माझा मूलभूत हक्क,

      जर माझ्या संविधानाच्या अभ्यासातून EVM द्वारे तसेच जगात कुठेच हिचा वापर होत नाही.तीला सेटिंग करुन येथील व्यवस्था माझं मत हिरावून घेत असल्याचं जर मला समजलं ना….

      तर हे उपोषण,आंदोलन वगैरे काही करणार नाही…

     या मोदी -शहाला न घाबरता या मशीनला मी स्वतः फोडून टाकल्याशिवाय राहणार नाही….

    आंदोलने,उपोषण,जागृती, या लोकशाही मार्गाचा अवलंब जिथे सपंतो…..

    व्यवस्थेच्या गाढवाला टोमक्याचा मारच कामात येतो…

    शेवटी त्याशिवाय पर्यायच नसतो…

     असं परिवर्तन करुन स्वतःच्या मूलभूत हक्काचे संरक्षण करण्याची शक्ती प्रत्येक भारतीय नागरिकाला संविधान देते.

म्हणूनच…

 या देशाचा मी (भारताचा प्रत्येक नागरिक ) मालक आहे…

        व्यवस्थेचा गुलाम नाही…

      जागृतीचा कृतिशील लेखक

             अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक,औरंगाबाद, रेणापूरकर, 7875452689…