महेजबिन सैय्यद
संपादिका
(वर्धा)
दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादिका
(नेरी/नागपूर)
व्यसनाधीन व्यवस्था रुढ होण्यास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणे म्हणजे नागरिकांच्या पिढ्यानपिढ्या दरपिढ्या बरबाद करणे होय.तद्वतच व्यसनाधीन व्यवस्था अंतर्गत नागरिकांना गुन्हेगार बनविने होय,लाचार,दुराचारी व कंगाल करणे होय.
पारतंत्र्याच्या काळात राष्ट्रपिता महात्मा गांधी हे १९३४ ला वर्धा येथे राहण्यास आले होते व त्यांनी आचार्य विनोबा भावे यांच्या सहकार्याने स्वातंत्र्य चळवळीच्या आंदोलनाला गती दिली होती.याचबरोबर सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे नेतृत्व सुध्दा त्यांनी वर्धा जिल्ह्यातून सुरू केले असल्याचे अधोरेखित आहे.म्हणूनच राष्ट्रपिता महात्मा गांधींचा जिल्हा म्हणून अख्या भारत देशात वर्धा जिल्ह्याची ओळख आहे.यामुळेच वर्धा जिल्ह्यातील बापू कुटी व सेवाग्राम भारत देशाच्या इतिहासात सातत्याने झळकतो आहे, देशातील नागरिकांना प्रेरणा देतो आहे.
महात्मा गांधींच्या व आचार्य विनोबा भावेंच्या इतिहासीक कार्याचा स्तंभ नेहमी प्रेरणा बनून नागरिकांसमोर राहावा यासाठी वर्धा जिल्हा व्यशनमुक्त असावा यासाठी १९७५ ला दारुबंदी जिल्हा म्हणून महाराष्ट्र शासनाने निर्णयातंर्गत घोषित केला.
दारुबंदीच्या घोषणेनंतर काही वर्ष वर्धा जिल्हा दारु मुक्त म्हणून भारतात लौकिकाने मानसन्मान मिळवू लागला.मात्र कालांतराने या जिल्ह्यात दारुने हळूहळू शिरकाव केला आणि संपूर्ण जिल्हाच दारुमय झाला असल्याचे चित्र रंगले.
याचबरोबर या जिल्ह्यात गांजा,चरस विक्रिची प्रकरणे घडू लागली आणि खून दरोड्यांची रंजीत तर वर्धा जिल्ह्याला खूनावू लागली होती.
वर्धा जिल्ह्यातील क्राईम प्रकरणामुळे या जिल्ह्यातील नागरिक अशांत झाले होते व भयभीत झाले होते.तद्वतच व्यसनाधीन व्यवस्थेच्या गर्तेत जिल्ह्यातील नागरिक अडकू लागले होते.
या जिल्ह्यातील नागरिकांचे भाग्य म्हणा,”की,अजून काही समजा,मात्र वर्धा जिल्ह्याला संवेदनशील दक्ष पोलिस अधीक्षक नरुल हसन लाभले आणि जिल्ह्यात दारु विक्रेत्यांच्या मुसक्या त्यांनी आवळणे सुरू केले.
तद्वतच गांजा,चरस विक्री प्रकरणाकडे,व इतर क्राईम घटनांकडे बारीक नजर ठेवून त्यांनी त्यांच्यावर सुध्दा अंकुश लावण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून शर्थीचे प्रयत्न केले आहेत आणि त्यांच्या वर्धा जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यकाळात व्यशनमुक्त वर्धा जिल्हा करणार असे जाणवू लागले आहे.
पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या संवेदनशील परिश्रमामुळे व उत्तम कर्तव्यामुळे आज वर्धा जिल्ह्यातील क्राईम घटना जमा होत असून वर्धा जिल्हा व्यशनमुक्ततेकडे वळण घेवू लागला आहे.याचबरोबर रंजीत घटना सुध्दा सध्या स्थित बंद असल्याचे दिसून येते आहे.
म्हणूनच एक इमानदार व कर्तव्यदक्ष अधिकारी आपले कर्तव्य सदैव जनतेच्या हितासाठी करीत असेल तर तो जिल्हा नागरिकांच्या समाधानकारक वृत्तीने व कृतीने फुललेला दिसतो असेच म्हणावे लागेल.म्हणूनच वर्धा जिल्हा पोलिस अधीक्षक नरुल हसन यांच्या संवेदनशील दक्ष कर्तव्यातून वर्धा जिल्हा फुलू लागलाय असे म्हणावे लागेल.
याचबरोबर पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या उत्तम दिशादर्शक कर्तव्यातून वर्धा जिल्हा व्यशनमुक्ततेकडे वळण घेवू लागला असल्यामुळे हा जिल्हा राष्ट्रपिता महात्मा गांधींचा असल्याचा सार्थ अभिमान वाटतो आहे….