चंद्रपूर जिल्ह्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 64.48 टक्के मतदान…

      रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधि 

चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सहा मतदार संघात आज (दि. 20 नोव्हेंबर) बुधवारी सकाळी 7 वाजतापासून मतदान सुरू झाले असून सायंकाळी 5 वाजता पर्यंत राजुरा मतदार संघात 65.59 टक्के मतदान झाले.

           चंद्रपूरमध्ये 53.57 टक्के, बल्लारपूर मध्ये 63.44 टक्के, ब्रह्मपुरी मध्ये 72.97 टक्के, चिमुरमध्ये 74.82 टक्के तर वरोरा मतदार संघात 60.21 टक्के मतदान झाले आहे.