
प्रितम जनबंधु
संपादक
आरमोरी :- गडचीरोली जिह्यात शासनाने अनेक वर्षा पुर्वी पासून संपुर्ण दारू बंदी जाहिर केली असली तरी मात्र गडचीरोली जिल्हात दर वर्षी कोटीच्या वर अवैध दारू जिल्हात आणली जाते आणी सर्रासपणे विकली जाते. पोलिस आणि एक्साईज विभागाच्या नाक्यातून अधिकारी व कर्मचारी याची सीमाभागात गस्त असताना यांच्या नजरेखालुन अवैध दारू जिल्हात आणली जातेच कशी? हे एक न सुटनारे कोडचं म्हणावं लागेल ? यावरुनच पोलीस प्रशासनाच्या कर्तव्यदक्ष जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे. यावर वरीष्ठ स्तरावरून शोध लावण्याची गरज आहे.
संबधीत प्रशासकीय यंत्रणेच्या मदतीशीवाय अवैध दारू जिल्ह्यात येऊ शकत नाही? हे निर्विवाद सत्य नाकारता येत नाही. अवैध दारू तस्कराचे मधुर संबंध येथील काही भ्रष्ट पोलिस अधिकारी व पोलिस शिपाया सोबत असल्याचे अनेक उदाहरणे गडचीरोली जिल्हात तसेच आरमोरी तालुक्यातील लोकांना अवगत झाले असल्याचे बोलल्या जात आहे. यातून हेच लक्षात येते की, आरमोरी शहरासह तालूक्यातील वैरागड, मानापुर, वडधा, इजेवारी, देऊळगाव, ठानेगाव आणि ग्रामीण भागात येणारी अवैध दारू तस्करांना पोलिसांचे किती सहकार्य आहे याची प्रचीती होने गरजेचे झाले आहे. याकडे डोळेझाक करून चालणार नाही. जर “कुंपणच शेत खायला लागल” तर जनसामान्यानी न्याय मागायचा तरी कुणाकडे ? अशी नामुष्कीची वेळ तालुक्यातील जनतेवर आली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात सर्व मुख्य शहरांमध्ये रोज सरोसपणे अवैध दारू विक्री खुले आम सुरु असुन, पोलिस प्रशासनाची कार्यवाही मात्र शुन्य होत असल्याचे दिसुन येत आहे. याचे कारण इतकेच आहे की, साहेबांच्या सक्रिय वसुली पथकाचे या अवैध दारू तस्करांशी देवाण घेवाणाशी नाते असावेत असा संशय व्यक्त केल्या जात आहे. त्यामुळेच कारवाईला पूर्णविराम मिळाला असावा असा अंदाजही वर्तविण्यात येत आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील पोलिस अधिकारी छोठ्या अवैध दारु विक्री करणा-यावर कार्यवाही करूण खुप मोठ्या गाजा वाजा करूण छायाचित्र काढून प्रेस नोट वार्ताहरांना प्रसारित करून अशे भासवतात की संपूर्ण आरमोरी तालुक्यातील अवैध दारू विक्री आता बंद झाली की काय असाच काही गैर समज थोडा वेळा साठी व्हायला लागतो. परंतु पोलिसांकडून पकडल्या गेलेला दारू साठा हा फक्त दारू विक्रेत्याचा 10 टक्के असतो व त्या मुख्य दारू विक्रेत्या जवळ रोजी मजुरीने काम करणा-यावर 10 (नग) नीप दारु ची केस तयार करून त्याला लवकरात लवकर कशा प्रकारे जामिन मिळेल यासाठी संबधीत ठेकेदार काही तकलादु अधिकाऱ्यांना हाताशी धरून धडपड करत असतो. या सर्वावर आता कुठे तरी अंकुश लागणे काळाची गरज आहे.
आरमोरी तालूक्यात अवैध दारुचा महापुर…!
आरमोरी व तालूक्याच्या आजूबाजूच्या ग्रामीण भागात दिवसाढवळ्या अगदीच राजरोसपने देशी, विदेशी, इंग्लिश दारू चा ऊहापोह फार मोठ्या प्रमाणात दिसुन येत आहे. काही दिवसांपुर्वी रुजु झालेले जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल काय निर्णय घेतील याकडे तम्माम जिल्हातील नागरीकाचे लक्ष लागलेले आहे. अवैध दारू तस्कर व अवैध दारू विक्री करणारे आणि वसुली करणारे भ्रष्ट शिपाई जेरबंद होतील काय? याची प्रतिक्षा आम जनतेला लागली आहे.
गडचिरोली जिल्हातील अवैध दारू बंद होईल की, आणखी मोठ्या प्रमाणात वाढ होईल? तालुक्यात सर्वत्र सुरू असलेला अवैध दारुचा महापुर हा तमाम जनतेला, युवकाना नशेत गुंग करुन अप्रगत ठेवण्याचा षडयंत्र करणाऱ्या मद्दसम्राटावर लगाम लागणार काय? यावर नियंत्रक म्हणुन जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल यांचेकडे आरमोरी तालुक्यातील जनता मोठ्या आशेने बघत आहे.