कमलसिंह यादव 

प्रतिनिधी

    कन्हान : – शहरातील राष्ट्रीय महामार्ग वरील बंद अस लेली हिंदुस्तान लिव्हर कंपनी ची जागा विकल्या नंतर त्या जागेवर वाढीव दराने शहर आणि सिटी प्रमाणे विक्री करीत असल्याने स्थानिक दुकानदारां मध्ये तीव्र रोष निर्माण झाल्याने दुकांनदारांनी नप मुख्याधिकारी अर्चना मेंढे, नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर यांची भेट घेऊन, चर्चा करून त्यांना निवेदन देऊन बंद अस लेली हिंदुस्तान लिव्हर कंपनीच्या जागेवर मार्केट यार्ड, हाॅकर्स झोन, साप्ताहिक व गुजरी बाजार, भाजीपाला विक्रेता दुकानदार, बस स्टैंड करिता जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदो लनाचा इशारा सुध्दा देण्यात आला आहे.

        मौजा कन्हान-पिपरी येथील बंद पडलेल्या औद्यो गिक कंपनी ब्रुक बॉन्ड ही हिंदुस्तान लिव्हर लि. कंपनी ला विकण्यात आली. ही कंपनी चालु होऊन शहरात रोजगार मिळणार परंतु हिंदुस्तान लिव्हर लि. कंपनी सुध्दा बंदच राहिल्याने जागा ओसाड झालेल्या अवस्थे त असल्याने (दि.५) नोंव्हेबर २०१८ ला कन्हान- कांद्री दुकानदार महासंघा च्या पदाधिकारी व दुकानदारांनी नगरपरिषद प्रशासनाला निवेदन देऊन हिंदुस्तान लिव्ह र कंपनीच्या जागेवर मार्केट यार्ड, हाॅकर्स झोन, साप्ता हिक व गुजरी बाजार, भाजीपाला विक्रेता दुकानदार, बस स्टैंड आणि शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता उपयोगात घेण्याची मागणी केली होती. परंतु नगरपरि षद प्रशासनाने सदर विषया कडे गंभीर्याने लक्ष केंन्द्री त न केल्याने हिंदुस्तान लिव्हर कंपनीची जागा विक ण्यात आली. यामुळे शहराच्या सर्वांगीण विकासा वर प्रश्न निर्माण झाला आहे. मागील कित्येक वर्षापासुन शहरात रिकामी जागा नसल्याने राष्ट्रीय चारपदरी महा मार्गावर फुटपाथ, गुजरी आणि साप्ताहिक बाजार भर त असल्याने नागरिकांना व दुकानदाराना जिव मुठीत घेऊन सामानाची खरेदी विक्री करावी लागत आहे. यास्तव विविध संघटने द्वारे अनेकदा नगरपरिषद प्रशा सनाला निवेदन देऊन प्रशासनाने हिंदुस्तान लिव्हर कंपनीची रिकामी जागा विकत घेण्याची मागणी केले ली आहे. नगरप्रशासनाने शासना ला सैधा पत्र व्यवहा र सुद्धा न केल्याने आज हिंदुस्तान लिव्हर कंपनी ची जागा बाहेरील काही लोकांना विकण्यात आल्याने समोर फुटपाथ वर बसलेले दुकानदाराना हटविण्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. साप्ताहिक व गुजरी बाजार रस्त्यावर भरत असुन बस स्थानकाची जागे अभावी व्यवस्था नाही. पोलीस स्टेशन ला सुध्दा जागा नसताना त्यांची व्यवस्था कुठे होईल असा प्रश्न असता ना सुुध्दा हिंन्दुस्तान लिव्हर कंपनी ची जागा ज्यांनी विकत घेतली. त्या जागेवर वाढीव दराने शहरा प्रमाणे, स्मार्ट सिटी प्रमाणे प्लाॅट विक्री करीत असल्याने संबं धीत ले-आउट चे दस्ताऐवजा ची कायदेशीर चौकशी करून रोकथाम लावण्या यावे. आणि ही जागा नगर परिषदेने शहराच्या विकासाकरिता सरकारच्या माध्य मातुन खरेदी करून येथे मार्केट यार्ड, हॉकर्स झोन, चिल्लर, ठोक भाजीपाला विक्रेता दुकानदार, साप्ता हिक व गुजरी बाजार, बस स्थानक, पोलीस स्टेशन आदी शहराचा सर्वांगीन विकासाच्या दुष्टीने या एकमेव असलेल्या जागेचा उपयोग करावा. अशी मागणी दुकानदार बांधवांनी नप मुख्याधिकारी अर्चना मेंढे, नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर हयांना निवेदन देऊन केली आहे. जर मागणी वर सुध्दा जाणीव पुर्वक अमलबजावणी करण्यात न आल्यास तीव्र आंदोलना चा इशारा देण्यात आला आहे. याप्रसंगी कन्हान- कांद्री दुकानदार महासंघ अध्यक्ष अकरम कुरैशी, सचि व प्रशांत मसार, प्रदीप गायकवाड, सचिन गजभिये, नितिन रंगारी, ऋृषभ बावनकर, चिराल वैध, अमोल मोहबे, गजानन कपाटे, रणवीर पात्रे, जावेद सैयद, शिवशंकर हालमारे सह दुकानदार बांधव मोठ्या संख्ये ने उपस्थित होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com