रस्ता चोर म्हणजे काय? — चिमूर विधानसभा मतदार संघातील रस्ते,मुरुम,माती,रेती चोरीला जाऊ लागली!… — सर्व रस्त्यातंर्गत रस्ता बांधकामांची इतंभूत माहिती देणारे दर्शनीय फलक का म्हणून लावण्यात आली नाही?  — म्हणूनच भोंगळ कारभार?

 

प्रदीप रामटेके 

मुख्य संपादक 

              अप्रत्यक्षपणे आमदार किर्तीकुमार भांगडिया यांचा रस्ता चोर व रॉयल्टी चोर,असा सार्वजनिक उल्लेख जनसंवाद यात्रा समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करताना करुन विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी खडबळ माजवून दिली.

             मात्र,रस्ता चोर म्हणजे काय? “हेच, सभेला उपस्थित असलेल्या हजारो जनसमुदायाला कळले नाही.परंतू रस्ता चोरीचे प्रकार खालील प्रमाणे असू शकतात.

          १) नियमानुसार रस्त्याचे बांधकाम न होणे,२) रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होणे,३) रस्त्याचे बांधकाम अरुंद होणे,४) रस्त्याचे बांधकाम अंदाज पत्रकीय आराखड्या नुसार न होणे,५) रस्त्याचे बांधकाम अजिबात न होणे…

              चिमूर विधानसभा मतदार संघात,१) भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण कार्यालय गडचिरोली,२) सार्वजनिक बांधकाम उपविभागिय अभियंता कार्यालय चिमूर,३) कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम कार्यालय नागभीड,अंतर्गत रस्त्याचे बांधकामे झालेली आहेत व काही कामे उर्वरित आहेत.

           यात,१) शंकरपूर-आंबोली-भिसी-जामगाव-चिमूर-मासळ-पळसगाव-पिपर्डा-शिवणी ते सिंदेवाही.२) भिसी-आंबेनेरी-जांभुळघाट-रामपूर-नेरी.३) चिमूर-नेरी-मोटेगाव-पेंढरी-नवरगाव.४) चिमूर-नेरी-शिरपूर-बोधली-येणापूर-तळोधी (बा.).५) चिमूर-नेरी-मोटेगाव-काजळसर-लोहारा-नवतळा-डोमा-किटाळी-शंकरपूर या पाच मोठ्या रस्ता बांधकामाचा समावेश आहे. 

           सर्व रस्त्यांची बांधकामे सुरु करताना,”बांधकाम करणे संबंधाचा दर्शनीय फलक,रस्ता बांधकाम कंत्राटदार कंपनी धारकांनी कुठेच लावलेले दिसत नाही.

             वास्तविक रस्ता बांधकाम संबंधाने सविस्तर माहिती देणारे दर्शनीय फलक जागोजागी लावणे आवश्यक होते.रस्ता बांधकामाचे दर्शनीय फलक जागोजागी असते तर कुठल्या कार्यलयातंर्गत व कुठल्या योजनातंर्गत रास्ता बांधकामे मंजूर झाली आहेत आणि कुठल्या कार्यलयातंर्गत कामे केली जात आहेत व सुरु आहेत हे सरळ कळले असते.

              याचबरोबर सदर रस्त्याचे बांधकाम किती किलोमीटर पर्यंत आहे हे कळले असते आणि सदर रस्त्याला पर किलो मीटर प्रमाणे खनीज मेटल व इतर साहित्य किती वापरायचे आहे ते संबंधित नागरिकांना माहित झाले असते.

            काही कामे गडचिरोली भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण कार्यालयातंर्गत केली जात आहेत तर काही कामे सार्वजनिक बांधकाम उपविभागिय अभियंता कार्यालय चिमूर व कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम कार्यालय नागभीड द्वारा केली जात असल्याने विरोधी पक्षाचे व सत्ता पक्षाचे आमदार,खासदार यांचा संबंध सदर रस्त्याचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार कंपनी धारकांसोबत राहात नाही असे म्हणता येत नाही.

                 तद्वतच सदर कार्यालयातंर्गत सर्व रस्ता बांधकाम संबंधाने बरोबर माहिती दिली जात नसल्याचे प्रखर अनुभव आहेत.

                 यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी कोणत्या उदेशांनी,”रस्ता चोर,म्हटले हे त्यांनी गुलदस्त्यात ठेवले आहे व जन चर्चेला वाट मोकळी करून दिली…

           मात्र,चिमूर विधानसभा मतदार संघात कुठल्याही प्रकारच्या माध्यमातून रस्ता चोरीचा प्रकार घडलेला असेल तर तो गंभीर प्रकार आहे आणि सर्व प्रकारे रस्ता बांधकाम संबंधाने खरबो रुपयांचा भ्रष्ट्राचार झाला असावा,असे म्हणायला वाव आहे असे चिमूर विधानसभा मतदार संघातील जनता बोलू लागली आहे. 

              विधानसभा विरोधी पक्षनेते ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या म्हणण्यानुसार चिमूर विधानसभा मतदार संघातंर्गत रस्ता चोरीचा प्रकार तिव्र संवेदनशील व अतिशय गंभीर असल्याने त्यांच्या सार्वजनिक वक्तव्याला महत्व देत,भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कार्यालय गडचिरोली व सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी सखोल चौकशी करणारी तज्ञांची टिम नेमावी व रस्त्याची चोरी बाहेर आणणे आवश्यक आहे.

            सदर सर्व रस्ता बांधकामातंर्गत जे संबंधित दोषी आढळून येतील त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी अशी आम जनता दबक्या आवाजात आता चर्चा करू लागली आहे.