
भविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
नैसर्गिक नुकसानीचे पंचनामे करायला शासन मुंबई दिल्लीतून आव्हाहन करतात, त्यांना भरपाई देण्याचे ही आश्वासन दहाड फोडून जनतेतून निवडून गेलेले लोकप्रतिनिधी तिथूनच बोलबाला करीत असतात.
मात्र नैसर्गिक नुकसानीचे तीन वर्षा पासून शासनाकडून अनुदान मिळालेच नसल्याने मला आता झालेल्या नुकसानीचे अनुदान कोणत्या वर्षी मिळेल अशी आर्त हाक मनिराम हलामी यांनी आपले मत सदर प्रतिनिधी जवळ व्यक्त केले.
नुकताच (18 व 19 आक्टोबर रोजी ) दोन्ही दिवस अचानक वीज वाऱ्यासह पावसाने धुमाकूळ लावून धान पिकासाहीत इतर पिकाना खुप मोठा झटका बसून शेतकऱ्यांचे नुकसान झाले.याच बरोबर या पावसात घराची पडझडही झाली.यात ग्रामपंचायत तुकुम येथिल मनिराम देवाजी हलामी रा तुकुम यांचे घर 19 आक्टोबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास पावसाने धुमाकूळ घातल्याने राहत्या घराची भिंत कोसळून फार मोठे नुकसान झाले.
सुदैवाने भिंत विरुद्ध दिशेने पडल्याने फार मोठी जीवित हानी टळली, कारण त्याच भिंती जवळ परिवारातील सदस्य झोपले होते.सरासरी मध्यरात्री ची वेळ असल्याने परिवारातील सदस्य गाठ झोपेत होते, ह्या प्रकाराणे भिंत कोसळल्याने ते घाबरून जागे झाले.सुदैवाने विरुद्ध दिशेने भिंत पडल्याने बचावल्याचे परिवाराणी सांगितले.
आता तरी घरकुल मिळेल का, साहेब —
शाषणाच्या अनेक जनकल्याणकारी योजना असुन त्या फक्त कागदावरच आहेत, मनिराम हलामी व परिवारातील सदस्यांचे घरकुल ग्रामपंचायत मधील कोणत्याच यादीत नाव समाविष्ट नाही.ग्रामसभेत मात्र नोंद करतात यादीत नाव नाही राहत,गरजूना घरकुल नाही बिनगरजूना घर दिला जातो.हा कसा न्याय ग्रामपंचायत कार्यालय व एकात्मिक आदिवासी प्रकल्प का गडचिरोली अंतर्गत शबरी आवास योजना यातून दोन सालापासून आम्ही परिवार सातत्य अर्ज व पाठपुरावा ही करीत आहोत, परंतु आमच्याकडे शाशनाचे लक्ष नाही, म्हणून साहेब, आता तरी घर मिळेल का ?