बसची बाईकला धडक,१७ वर्षीय विद्यार्थी जागीच ठार… — ३५३ ई राष्ट्रीय मार्गावर चकाजाम,दंगा नियंत्रण पथकाला केले पाचारण.. — राष्ट्रीय महामार्गाचे काम मंदगतीने होत असल्याने वारंवार होतात अपघात,कंपनी प्रमुखावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल होणे आवश्यक..

प्रदीप रामटेके 

  मुख्य संपादक 

          पोलीस स्टेशन शेगाव (बु.) अंतर्गत मौजा भेंडाळा पाटीवर आज सकाळी ७ वाजताच्या दरम्यान चिमूर आगाराच्या बसने बाईकला जोरदार धडक दिल्याने १७ वर्षीय विद्यार्थी जागीच मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना घडली.

        चिमूर आगारातंर्गत एम.एच.४०,बी.एल.३९८८,क्रमांकाची बस चिमूर वरुन चंद्रपूरला मार्गक्रमण करीत होती.मार्गक्रमण करीत असताना भेंडाळा चौपाटीवर बसने सुजलच्या बाईकला जोरदार धडक दिली.

        या धडकेत सुजल बाईकसह बसच्या वरच्या काचेवर जाऊन धडकला व बाईकसह बसच्या पुढच्या चक्क्यात येऊन घसाटत गेला.यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

     सिटी १०० दुचाकी क्रमांक एम.एच.३४,बि.एस.९४६४ या बाईकने मौजा भेंडाळा येथील १७ वर्षीय सुजल राजू साळवे हा शेतावर जात होता.

       अपघाताची घटना वाऱ्यासारखी परीसरात पसरली.यामुळे परीसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत प्रचंड गर्दी केली.

        एवढेच काय तर रस्ता रोको आंदोलन करुन प्रवासांचे आवागमन थांबविले.यामुळे चिमुर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव घटनास्थळी पोहोचले व जमावाला शांत करण्याचा व मार्गावरील आवागमन सुरु करण्याचा प्रयत्न केला.

      मात्र,उपस्थित जमावाने कंपनीकडून मागण्या पुर्ण झाल्याशिवाय महामार्गावरील सुजल राजू साळवेचा मृतदेह उचलणार नाही असा निर्धार केला.यामुळे सदर महामार्गाने प्रवास करणारे प्रवासी परेशान झाले,हतबल झाले.आणि त्यांच्या वाहनाच्या लांब दूर पर्यंत दोन्ही बाजूंनी रांगाचरांगा लागलेल्या होत्या.

           अटी अंतर्गत समस्या सुटत नसल्याने अनुचित घटना घडू नये यासाठी चंद्रपूर वरुन दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले.

        अपघात झाल्यानंतर बस चालक पोलिस स्टेशन शेगाव (बु.) येथे जाऊन स्वतः जमा झाले.

         ३५३ ई राष्ट्रीय माहामार्गाचे बांधकाम धिम्या गतीने सुरु असल्याने व सदर रस्ता बांधकामांचे नियोजन योग्य प्रकारे नसल्याने या राष्ट्रीय महामार्गावर अनेकदा अपघात झाले असून अनेकांना प्राण गमवावे लागले आहे.

       तरीही या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम कंत्राटदार विशेष लक्ष देऊन काम वेळेत करत नसल्याचे दिसते आहे.

           असे असताना सत्ताधारी झोपा काढतांना दिसतात‌.त्यांच्या झोपाच सर्वांत मोठे नागरिकांवरील संकट आहे,असे आता वाटते आहे.

          सदर अपघात घटना महाराष्ट्र राज्यांतर्गत विदर्भातील आहे.विदर्भातंर्गत “चंद्रपूर जिल्ह्यामधील वरोरा तालुका व शेगाव (बु.),पोलीस स्टेशन हद्दीतील आहे.