दारू तस्करी करणारे वाहन मुद्देमालासह पोलिसांच्या ताब्यात…

ऋषी सहारे 

    संपादक

आरमोरी :- अवैध दारू तस्करीची माहिती मिळताच आरमोरी पोलिसांनी सापळा रचून अवैध दारू तस्करी करणाऱ्या वाहनावर कारवाई करीत 2 लाख 2 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई शुक्रवारी (दि.18) रात्री 10.30 वाजताच्या सुमारास जोगीसाखरा गावाजवळ केली.                प्राप्त माहितीनुसार, आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा मार्गावरून अवैधरित्या दारूची तस्करी होत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक कैलास गवते यांना मिळाली.

          या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने जोगीसाखरा गावाजवळ सापळा रचला. दरम्यान, एमएच 03 एडब्लू 5877 क्रमांकाची कार संशयिरित्या येताना दिसून आली.पोलिसांनी कारला थाबंवून तपासणी केली असता, वाहनात 52 हजार 500 रुपयांची दारू आढळून आली.

        पोलिसांनी दारू व 1 लाख 50 हजार रुपये किमतीची कार असा एकूण 2 लाख 2 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पो.शि. लखन मामुलकर यांनी केली.