ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली, दि. २० : ६७ वा धमचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे अंतर्गत, उपकेंद्र नागपूर मार्फत दि. २३ व २४ ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमी येथे स्टॉल क्रमांक २६२ व २६३ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार ग्रंथाचे ८५ टक्के सवलतीच्या दरात विक्रीस उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सोबतच सामाजिक न्याय भवन येथे बार्टीच्या विविध योजनांची माहीती सांगण्यात येणार आहे. योजनांशी सबंधीत माहितीपत्राचे वाटपही केल्या जाणार आहे.
दिनांक २३ ऑक्टोबर रोजी विविध सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यात सकाळी दहा वाजता सामाजिक न्याय भवन ते दीक्षाभूमी असे समता रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. समाजिक न्यायभवन येथे भिमवादळ या ढोल ताशा पथकाच्या माध्यमातून बाबासाहेबांना मानवंदना देण्यात येणार आहे. दुपारी तीन नंतर सामाजिक न्याय भवन येथे खुल्या कवीसंमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. संध्याकाळी पाच नंतर संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या सर्व कार्यक्रमात अधिक संख्येनी नागरीकांनी सहभागी होण्याचे आवाहन महासंचालक बार्टी तर्फे करण्यात आलेले आहे.