चेतक हत्तीमारे

जिल्हा प्रतिनिधी

 

धारगाव: अखिल भारताला मानवतेचे शिकवण देणारे मानवतेचे पुजारी, सर्व धर्मसमभावाची व्यापकता आणणारे भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत मोलाचे योगदान असणारे वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा व शालेय अभ्यासक्रमात तुकडोजी महाराजांवर आधारित धडा समाविष्ट करण्यात यावा अशी मागणी इंजि. अक्षय कहालकर व डॉ. प्रियंका कहालकर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे.

 

सबका भला करो यही आवाज करेंगे ही निस्वार्थ भावना सूर्योदयापासून सूर्यास्त होईपर्यंत, माणसात देव पाहणारा “देवमाणूस ” जगाच्या पाठीवर शोधूनही सापडणार नाही अशा ह्या जिवंत आत्म्याला अर्थात जिवंत विचारांना आपण कदापि विसरू शकत नाही कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलेले ते विचार काल, आज आणि उद्याही शाश्वत आहे. तुकडोजी महाराज आजच्या भोंदू पाखंडी धर्मवादी जातीयवादी साधून सारखे महाराज मुळीच नव्हते तर माणुसकी प्रेम हा एकच धर्म मानणारे व अखंड भारत स्वतःचे घर व भारतातील प्रत्येक माणूस घरातील सदस्य आहे असे मानणारे होते. 1942 च्या स्वातंत्र्य युद्धात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खंजेरीच्या माध्यमातून समाज प्रबोधन करून गावोगावी खेड्यापाड्यात अहोरात्र मेहनत करून, तरुणांना एकत्रित करून स्वातंत्र्याविरुद्धची चळवळ उभी केली होती. प्रत्येक खेड्यापाड्यात शाखा तयार होत्या. “पत्थर सारे बाम बनेंगे, भक्त बनेगी सेना” ह्या एका वाक्याने इंग्रजांना हतबल केलं होतं व इंग्रजांचे पोलीस-ठाणे जाळून खाक केले होते, परिणामी त्यांना जेल पण भोगावे लागलं होतं अशा या स्वातंत्र्यसेनानी तुकडोजी महाराजांनी प्रत्येक माणसात देशभक्तीचे धडे देऊन देशभक्ती जागवली होती.

 

नुकत्याच 14 ऑक्टोबरला झालेल्या 54 व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त गुरुदेव आश्रम मोझरी येथे देश-विदेशातील पाच लाखांच्यावर गुरुदेव भक्त गोळा झाले होते, त्यामुळे राष्ट्रसंतांची चाहते देश आणि विदेशात असल्यामुळे भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा.

 

स्वातंत्र्यसेनानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एकच रसायन होते की जे अंधश्रद्धा, धर्मभेद , जातीयवाद , कर्मकांड , व्यसनाधिनता , परकीय आक्रमक इंग्रज यांच्याविरुद्ध लढा,व्यसनमुक्त समाज, शिक्षण, देशप्रेम, विज्ञानवाद, शाश्वत विकास, गावाचा विकास अशा बरेच कल्पना त्यांनी अमलात आणल्यात.

 

तुकडोजी महाराजांना भारतरत्न द्या म्हणजे भिक घाला असे नाही तर तो त्यांच्या कार्याच्या गौरव आहे. आपण सशक्त भारत करण्यासाठी शेकडो कार्यक्रम हाती घेतो पण जर पहिला वर्गापासून ते पदवीधर पर्यंतच्या अभ्यासक्रमात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवर धडा समाविष्ट केल्यास करोडोंचा खर्च वाचवू शकतो.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com