प्रतिनिधी//प्रलय सहारे
वैरागड : – येथील मरार (माळी) समाजात वास्तवात असलेल्या प्रसिध्द भाजीपाला व्यापारी ताराचंद शंकर लांजेवार (वय ५५ वर्षे) यांचे दि. 19 ऑक्टों. रोजी संध्याकाळी हृदय झटक्याने निधन झाले.
ताराचंद लांजेवार हे गावातील गांधी चौकात परिवारासोबत वर्षानुवर्षे भाजीपाला विक्री करीत होते. तसेच बाहेर गावात असलेल्या बाजार दिवशी तेथे भाजीपाला विक्री करीत होते. दि. 19 ऑक्टों. रोजी नेहमी प्रमाणे धानोरा तालुक्यातील रांगी या गावी आपल्या मुलासोबत भाजीपाला विकण्यास गेले होते. भाजीपाला विक्री करीत असताना अचानक छातीत दुखायला लागले. त्यांना रांगी येथील खाजगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. त्यानंतर तब्बेत जास्त खराब झाल्याने वैरागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात संध्याकाळी दाखल करण्यात आले असता आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषित केले.
आज दि. २० ऑक्टों. रोजी करपडा रोड वरील खोब्रागडी नदीवर दुपारी १२:०० वाजता अग्नी संस्कार करण्यात येत आहे. त्यांच्या पच्यात पत्नी, मुलगी, दोन मुले आणि मोठा लांजेवार परिवार आहे. त्यांचे मन मिळवू असल्याने त्यांचे निधन झाल्याने गावात आणि परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे.