प्रेम गावंडे
उपसंपादक
दखल न्युज भारत
मेहकर जिल्हा बुलढाणा येथे दिनांक 14 ते 16 ऑक्टोबर 2022 या कालावधीत स्व .अभिषेक प्रधान यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ पार पडलेल्या 23 वी महाराष्ट्र राज्यस्तरिय टग ऑफ वॉर अजिंक्यपद स्पर्धेत टग ऑफ वार असोसिएषन चंद्रपूर सिनियर महिलांच्या संघाने 500 किलो वजन गटामध्ये रितु हटकर ( कर्णधार ) हिच्या नेतृत्वा खाली उपविजेतापद पटकावूर संपुर्ण महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्हयाचे नाव उंचावीले सदर संघाला बक्षिस हे मेहकर चे आमदार डॉ . संजय रायमुलकर , टग ऑफ वॉर असोसीएषनचे प्रदेषाध्यक्षा डॉ . माधवी पाटील , सचिव जनार्धन गुपीले आंतर राष्ट्रीय खेळाडू श्रीराम निळे यांच्या हस्ते ट्रॉफी , मेडल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आले . सदर स्पर्धेमध्ये 22 जिल्हयातील 29 संघाने सहभाग केला होता. सदर स्पर्धेत मुलींच्या संघाला प्रशिक्षक म्हणुन बंडु डोहे तर व्यवस्थापक म्हणुनरिकेष ठाकरे व मार्गदर्षक म्हणुन प्रा. विक्की पेटकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होते . सदर संधामध्ये रितु हटकर ( कर्णधार ) राखी वाघाडे , प्रणाली गट्टीवार , भुमीका गेडाम , सोनाली येनोरकर , श्रृती कान्हेकर , आचल कुंभारे , पल्लवी मोहुर्ले , आरती सीडाम , स्वाती सातपुते यांचा समावेष होता.
या सदर स्पर्धेच्या यशाबद्दल टग ऑफ वॉर असोसिएषन चंद्रपूरचे अध्यक्ष डॉ . अनिस अहमद खॉन , उपाअध्यक्ष डॉ. विजय सोमकुवर , उपाअध्यक्ष डॉ . पैलेद्र गीरीपुंजे व सचिव प्रा. विक्की तुळषीराम पेटकर , सहसचिव बंडु डोहे व इतर पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या.