वनपरिक्षेत्रधिकारी आलापल्ली यांना आधी निलंबित करा… मगच चौकशी करा… अन्यता पुढील आंदोलन… उपोषणकर्त्याचे ठिय्या आंदोलन….

ऋषी सहारे

संपादक

 गडचिरोली- आलापल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी टी सीएम गुरे प्रतिबंधक खोदकामात मजुरांच्या खोट्या सहया, आदिवासी मजुरांचे आंगठे सही नसुन इंग्रजीत सहया मारल्या व व्हावचर तयार करून कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार करणाऱ्या आलापल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी , वनरक्षक यांना आधी निलंबित करा व मगच चौकशी करा या मागणीसाठी मुख्य वनविभाग कार्यालय (प्रादेशिक ) यांच्या कार्यालया समोर ठिय्या आंदोलनास सामाजिक कार्यकर्ता शंकर ढोलणे , सरपंच कुळवे ‘ प्रणय भाऊ खुणे ‘ चंद्रशेखर सिडाम , निलकंठ सदोकर ‘ रविंद्र सेलोटे बसले असुन आजचा ९वा दिवश आहे. . तलवाडा , झमेला व आलापल्ली उपवन क्षेत्रात T Cm ‘ खोदकामात प्रंचड प्रमाणात भ्रष्टाचार करणारे दोषी अधिकारीच चौकशी समितीत कसे ? तेव्हा संबंधित अधिकार्‍यांना आधी निलंबित करा अन्यता उद्यापासुन भिकमांगो आंदोलन , ढोल बजाव आंदोलन , अर्धनग्ण आंदोलन , मुंडण आंदोलन व कार्यालयाला कुलूप ठोको आंदोलन.. दरदिवशी टप्पा टप्याने करणार असल्याची माहिती उपोषणकर्ते शंकर ढोलगे , सरपंच कुळवे व प्रणय खुणे यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांना दिली. मुख्य वनरक्षक रमेश कुमार यांना फोनवरून संर्पक साधला असता तिन सदस्याची कमेटी चौकशी करीत असुन अहवाल प्राप्त होताच पुढील चौकशी करु असे सांगीतले. 33 कोटी वृक्षलागवड भ्रष्टाचार प्रकरण वनविभाग वडसा येथे सत्यवान रामटेके वडसा हे सुद्धा दोनदा उपोषणाला बसले होते. गडचिरोली जिल्हियातील वन विभागा मधे चाललंय तरी काय असा सवाल नागरिक करीत आहेत .