राष्ट्रीय सेवा योजना स्वच्छता अभियान सर्व समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी तत्पर :- प्राचार्य डॉ.अश्विन चंदेल… — स्वच्छ भारत अभियान अंतर्गत विद्यार्थ्यानी घेतली शपथ…

      रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधि 

 चिमूर :- स्थानिक गांधी सेवा शिक्षण समिती द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने केंद्र शासन पुरस्कृत स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत १७ सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत महाविद्यालयातील रासेयो विभाग विविध कार्यक्रम राबवित आहे.

           स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता ही या वर्षाची ची थीम आहे. या अभियाना अंतर्गत परिसर स्वच्छता,वारसा स्थळ व सार्वजनिक स्थळांची स्वच्छता, समाज स्वच्छता संवांद इ.कार्यकमाचे आयोजन करण्यात येणार आहे. 

           या दरम्यान प्राचार्य डॉ.अश्विन चंदेल म्हणाले की राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयातील रा से यो राबवित असलेले स्वच्छता अभियान चिमूर तालुक्यातील सर्व समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी तत्पर आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले.

         यावेळी रासेयो स्वयंसेवकाना व उपस्थित सहकारी प्राध्यापकांना उपप्राचार्य डॉ. प्रफुल बन्सोड यांनी शपथ दिली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रा से यो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.प्रफुल राजुरवाडे यांनी केले. आभार डॉ. नितिन कत्रोजवार यांनी केले.