खासदार बळवंत वानखडे यांच्या घरासमोर वंचितचे निर्देशने नारेबाजी ; राजीनाम्याची मागणी… — खासदार समर्थक व वंचित चे कार्यकर्ते आमने-सामने…

युवराज डोंगरे 

   उपसंपादक

खल्लार :- कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या आरक्षण विरोधातील वक्तव्यावरून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने खासदार बळवंत वानखडे यांच्या दर्यापुरातील घरासमोर शुक्रवार (दि.20) दुपारी १ वाजता मोर्चा काढून नारेबाजी व निदर्शने करण्यात आले. दरम्यान खासदार समर्थक व वंचित चे पदाधिकारी,कार्यकर्ते आमने-सामने आल्यामुळे तणावाची स्थीती निर्माण होत चांगलाच राडा झाला.

                 आम्ही सत्तेत आल्यानंतर आरक्षण संपवू असे कथित वक्तव्य राहुल गांधी यांनी केल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठ वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा निरिक्षक प्रा.धैर्यवधन पुंडकर याच्या नेतृत्वात डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क ते खासदार निवास पर्यंत मोर्चा काढून जोरदार निदर्शने करण्यात आली.

           यावेळी त्यांच्या घरासमोर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ठीय्या देत आरक्षण विरोधी राहुल गांधीचा जाहीर निषेध, खासदार वानखडे राजीनामा द्या अशी नारेबाजी केली. त्याला प्रतिउत्तर म्हणून खासदार वानखडे यांच्या कार्यालयात उपस्थित समर्थकांनी सुद्धा विरोधात नारेबाजी केली.

         तसेच तणावाची परिस्थिती निर्माण होऊन आमने-सामने येत एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न होत असताना पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही बाजूनंच्या कार्यकर्त्यांची समजूत काढल्याने तणावाची परिस्थिती निवळली व पुढील अनर्थ टळला.

          यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा निरीक्षक प्रा.धैर्यवर्धन पुंडकर यांच्यासह वंचितचे जिल्हाध्यक्ष संजय चौरपगार, जिल्हा महासचिव साहेबराव वाकपांजर,विजय चौरपगार जिल्हा उपाध्यक्ष सदानंद नागे,आनंद इंगळे अँड.संतोष कोल्हे,संजीवन खंडारे,भिमराव कुऱ्हाडे, जिल्हा सचिव संतोष बगाडे, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष अंकुश वाकपांजर, अतुल पाटील नळकांडे,दामोधर तायडे,अशोक दुधंडे,दिलीप पळघामोल, आशिष खंडारे,राहुल जामनिक,प्रभाकर चौरपगार,विकास खंडारे तसेच वंचित चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.