“आझाद” चीं चुनावी घोषणा… — गडचिरोली, आरमोरी विधानसभा लढणार :- आझाद समाज पार्टीचा मेळाव्यात ठराव… — शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश आणि नियुक्त्या… –इच्छुक उमेदवारांनी 30 सप्टेंबर पर्यंत सादर करण्याचे आवाहन.. — “अहेरी” संदर्भात लवकरच भूमिका ठरणार…

ऋषी सहारे 

   संपादक

गडचिरोली : आझाद समाज पार्टीचा गडचिरोली व आरमोरी विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा जिल्हा प्रभारी धर्मानंद मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. मेळाव्याचे उदघाटक म्हणून पक्षाचे कार्याध्यक्ष विनोद मडावी, मुख्य मार्गदर्शक म्हणून जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, महिला अध्यक्ष तारका भडके उपस्थित होत्या.

           यावेळी पक्ष मजबूत करण व विस्तार करण्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या, आगामी निवडणुकीत पक्षाची भूमिका व धोरण, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी अशा विविध विषयांवर मार्गदर्शन आणि चर्चा करून काही ठराव सर्वानुमते ठरविण्यात आले.

            यामध्ये आगामी विधानसभेत आरमोरी व गडचिरोली क्षेत्रातील बांधणी झाली असल्याने दोन्ही विधानसभा ताकदीने लढण्याचे जाहीर करण्यात आले.

         पक्षाकडून सर्वानुमते काही संभाव्य उमेदवार सुद्धा जाहीर करण्यात आले व कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले. तसेच इतर इच्छुक उमेदवारानी दिनांक 30 सप्टेंबर 2024 पर्यंत गडचिरोली व आरमोरी या दोन विधानसभा क्षेत्रासाठी पक्षाच्या कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी केले.

           सर्वानुमते संभाव्य उमेदवारामध्ये गडचिरोली क्षेत्रासाठी विनोद मडावी व अंकुश नैताम तसेच आरमोरी विधानसभेसाठी आदिवासी विकास परिषदेचे अंकुश कोकोडे, वडसा तालुकाध्यक्ष संगीता नन्नावरे -मोटघरे व चेतन काटेंगे अशा 5 उमेदवारांची नावे पुढे करण्यात आली. योग्य वेळी तुल्यबळ उमेदवाराची निवड करण्याचे ठरले. “अहेरी” येथे लवकरच बैठक घेऊन अधिकृत भूमिका करणार असल्याचे प्रभारी धर्मानंद मेश्राम यांनी सांगितले.

           दरम्यान जिल्ह्यातील विविध भागातून शेकडोच्या संख्येने कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झाला. ज्यामध्ये युवकांची संख्या मोठी होती. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांत जास्तीत जास्त सुशिक्षित तरुणांना मैदानात संधी देणार असल्याचे कार्याध्यक्ष विनोद मडावी यांनी घोषित केले. पक्षप्रवेशासोबत पदाधिकारी नियुक्त्या सुद्धा करण्यात आला.

           यामध्ये जिल्हा संघटक पदी भाजपातुन आलेले हंसराज उराडे, आरमोरी विधानसभा प्रभारी पदी चेतन काटेंगे, गडचिरोली विधानसभा प्रभारी पदी धनराज दामले,विधानसभा अध्यक्ष पदी तडफदार अभ्यासू युवा दिनेश देशमुख,विधानसभा उपाध्यक्ष पदी जितेंद्र बांबोळे, विधानसभा सचिव पदी कवीश्वर झाडें, सहसचिव पदी रामदास मेश्राम त्याचप्रमाणे गडचिरोली तालुकाध्यक्ष पदी प्रा. नरेश मोहुर्ले, तालुका कार्याध्यक्ष पदी हेमंत रामटेके, तालुका उपाध्यक्ष पदी राहुल कुकुडकर,सचिव पदी सरपंच देविदास मडावी, तालुका संघटक पदी प्रणय दरडे, सहसचिव रुषी मडावी, तसेच युवा आघाडी गडचिरोली जिल्हा महासचिव पदी संघरक्षित बांबोळे, गडचिरोली तालुकाध्यक्ष पदी प्रदीप बांबोळे, तालुका उपाध्यक्ष पदी चंद्रकांत रायपुरे, तालुका सचिव पदी पंकज रामटेके, सहसचिव पदी उपसरपंच पंकज कन्नाके, चामोर्शी तालुका उपाध्यक्ष पदी मिलेश उराडे व तुकाराम कोहळे, गडचिरोली शहर उपाध्यक्ष पदी राजेश वैद्य इत्यादी पदाधिकाऱ्यांचीं नियुक्ती करण्यात आली. 

          संचालन पुरुषोत्तम रामटेके तर आभार आरमोरी तालुकाध्यक्ष ऋषिजी सहारे यांनी व्यक्त केले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी जिल्हा सचिव प्रकाश बन्सोड, जिल्हा सचिव कुणाल मच्छीरके, महिला सचिव शोभा खोब्रागडे, उपाध्यक्ष करुणा खोब्रागडे, गडचिरोली शहराध्यक्ष नागसेन खोब्रागडे, मीडिया प्रभारी सतीश दुर्गमवार, धानोरा तालुकाध्यक्ष प्रशांत पेदापल्लीवार, चामोर्शी तालुकाध्यक्ष रघुनाथ वासेकर, कार्याध्यक्ष उत्तम कोवे, वडसा तालुकाध्यक्ष बबन रामटेके, युवा अध्यक्ष हेमंत मेश्राम, कुरखेडा तालुकाध्यक्ष सावन चिकराम, युवा अध्यक्ष प्रशांत कोडवते, आरमोरी महिला अध्यक्ष स्वाती खोब्रागडे, शहराध्यक्ष नितीन भोवते, युवा अध्यक्ष शुभम पाटील, तालुका सचिव सुरेंद्र वासनिक गडचिरोली महिला तालुकाध्यक्ष सविता बांबोळे यांनी विशेष सहकार्य केले.