दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादिका
चंद्रपूर – शहरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना वृक्ष लावणे व त्यांना जगविणे हे पर्यावरणाच्या दृष्टीने का आवश्यक आहे याची जाणीव शालेय जीवनातच व्हावी या उद्देशाने शाळांसाठी आयोजित करण्यात आलेल्या वृक्षमित्र विद्यालय स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला असुन यात चिल्ड्रेन्स अकॅडेमी स्कुल,हिंदी माध्यमिक विद्यालय व लिटिल फ्लॉवर इंग्लिश स्कुल या शाळांना विविध वयोगटात प्रथम बक्षीस प्राप्त झाले आहेत.
१ जुलै पासुन सुरु झालेल्या या स्पर्धेत शासकीय तसेच खाजगी मिळून एकुण ६७ शाळा सहभागी झाली होत्या. अधिकाधिक वृक्षलागवड व उत्तमरीत्या संगोपन करणाऱ्या शाळांचे त्रयस्थ परीक्षकांमार्फत वृक्षारोपण,वृक्ष संरक्षण ,वृक्षारोपण दत्तक योजना (शिक्षक/प्राचार्य) ,वृक्ष संगती विशेष फुल / प्रजातीची लावणे, वृक्षारोपण और पर्यावरण संबंधी वॉल पेटींग,उचित जागेवर वृक्षारोपण,जनजागृती उपक्रम,कार्याची प्रसिद्धी, स्मृती वन, आंनदवन तयार करणे इत्यादी निकषांवर गुणांकन करण्यात आले.
यात वर्ग १ ते ५ या गटातील चिल्ड्रन्स अकॅडेमी स्कूलला प्रथम, इंदिरा गांधी उच्च प्रा. शाळेस द्वितीय, मनपा कर्मवीर कन्नमवार प्रा. शाळेस तृतीय बक्षीस,वर्ग ६ ते ८ या गटात हिन्दी माध्यमिक विद्यालयास प्रथम,खालसा कॉन्व्हेंटला द्वितीय, सवित्रिबाई फुले उच्च प्रा. शाळेला तृतीय बक्षीस व वर्ग ९ ते १२ या गटात लिटिल फ्लॉवर इंग्लिश स्कूलला प्रथम, नारायण विद्यालयास द्वितीय तर न्यू इंग्लिश हायस्कूलला तृतीय क्रमांकाचे बक्षीस प्राप्त झाले आहे.
या विजेत्या शाळांना अनुक्रमे ११ हजार,७ हजार व ५ हजार रुपये बक्षीस व सर्व सहभागी शाळांना प्रमाणपत्र व ट्रॉफी मनपा येथे कार्यक्रम आयोजित करून दिली जाणार आहे.