साकोलीत “गणेश वार्डाचा राजा” चे थाटात विसर्जन… — पोलीसांचे राहीले अतुल्य सहकार्य ; मिरवणुकीत लोटली युवक व महिलांची गर्दी..

 

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्युज भारत

साकोली : मुख्य शहरातील प्राचीन सन १९३२ श्री गणपती मंदिर, गणेश वार्ड येथील श्री बाल गणेश उत्सव मंडळ गणेश चौकातील “गणेश वार्डाचा राजा” श्री बाप्पांना अगदी जल्लोषात निरोप देऊन “पुढच्या वर्षी लवकर या” जयघोषात अख्खे तलाव वार्ड परीसर मंगळवार ता. १७ दुमदुमले होते. दहा दिवसीय श्री गणेशोत्सवात शहरातील सर्व गणेश मंडळांना उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिडाम व पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी अगदी अतुल्य सहकार्य करीत हा आनंदोत्सव पार पाडला हे उल्लेखनीय. 

           दहा दिवसीय श्री गणेशोत्सवात साकोली सिव्हिल वार्ड, गणेश वार्ड, शिवाजी वार्ड, पंचशील वार्ड, जमनापूर कॉलनी, फ्रेन्डस कॉलनी, एकता कॉलनी, तलाव वार्ड, प्रगती कॉलनी चौक, नर्सरी कॉलनी, पॉलीटेक्निक रोड परीसर, श्री विठ्ठल मंदिर सेंदूरवाफा, श्रीनगर कॉलनी, झेंडा चौक सेंदूरवाफा शहरात विविध ठिकाणी श्री गणेश मंडळांनी आकर्षक देखाव्यात श्रीबाप्पांची स्थापना केली होती. मंगळवारी मुख्य साकोली येथील श्री बाल गणेश उत्सव मंडळातील “गणेश वार्डाचा राजा” या विसर्जन मिरवणुकीत महिला पुरुषांनी एकच गर्दी केली होती.

         महामार्गावर सर्व मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीत पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. या गणेश वार्डातील आयोजनात श्री बाल गणेश उत्सव मंडळातील अध्यक्ष कुणाल देशमुख, उपाध्यक्ष आशिष कापगते, कोषाध्यक्ष रोहीत गुप्ता, प्रज्वल रोकडे, सचिव विवेक बैरागी, शैलेश गोबाडे, व्यवस्था प्रमुख आदित्य चेडगे रितीक तिडके, पुजारी अशोक गुप्ता सुरेश अंदुलकर, कार्यवाह राजु देखमुख, लिलाधर मुरकुटे, वरूण कळपते, शुभम देशमुख, रितीक बडोले, सहकार्यवाह आशिष चेडगे, देवा कापगते, मनिष मुलवाणी, अशोक देशमुख, निकेश सयाम तर सदस्यगण मयूर देशमुख, तरूण जैन, मोहित आगाशे, संकेत तिडके, चेतन देशमुख, दक्ष देशमुख, वरूण देशमुख, अंकुश गुप्ता, मंगेश डुंभरे, सोनू टिकेकर, लोकेश देशमुख, अमित डुंभरे, अमेय डुंभरे, विलास देशमुख, नामदेव शेंडे, अशोक देशमुख, महिला मंडळाच्या ज्योत्सना देशमुख, सुमन देशमुख, वैष्णवी टिकेकर, सुरभी डुंभरे, प्रिया चेडगे, ज्योती भोंगाणे, पल्लवी अंदूलकर, शशिकला कापगते, लता कापगते, रश्मी देशमुख, राणी देशमुख, लक्ष्मी जैन, मिना देशमुख, प्रिती देशमुख, कविता देशमुख, शारदा कळपते, शारदा समाय, मनिषा तिडके, मिना देशमुख, ज्योती भारद्वाज, मयूरी डुंभरे, वनिता कापगते, सुनिता कापगते, बुलबुल जैन, काजल डोंगरवार, निधी कापगते, मोनाली डोंगरवार, पमी जैन, प्रांजली कापगते, प्रिती रोकडे, मिनल पारधी, सिद्धी भारद्वाज, दिया भारद्वाज, अवनी आगाशे, दिव्या आगाशे आणि सर्व प्रभागातील जनतेने सहकार्य केले होते.

           दहा दिवसीय श्री गणेशोत्सवाला प्र. उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिडाम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्तात साकोली पोलीस ठाणे निरीक्षक संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिपक वानखेडे, पोलीस उपनिरीक्षक किशोर मित्तलवार, प्रशांत वडूले, सुमित्रा साखरकर यांच्यासह १६० पोलीस ताफांसह असंख्य होमगार्ड सुरक्षा रक्षक या मिरवणुकीत चोख बंदोबस्तात उपस्थित होते.

         तर विसर्जन स्थळी नगरपरिषद मुख्याधिकारी मंगेश वासेकर, प्रशासकीय अधिकारी स्वप्निल हमाने, कल्याणी भंवरे, शुभम द्रुगकर, प्रकाश गेडाम, आनंद रंगारी, सचिन डोमळे, आणि चमुंकडून पाणबूडी व जलतरणपटू तैनात करण्यात आले होते.