ऋषी सहारे
संपादक
आरमोरी तालुक्यापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या डार्लिं शेत शिवार परिसरात दि.२०/०९/२०२४ शुक्रवार रोजी दुपारच्या दोन वाजून तीस मी.चे सुमारास विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदर महिला ही नरोटी माल या गावची रहिवासी असून शेती कामाकरिता आपल्या शेतावर गेली होती. परंतु दुपारच्या सुमारास आकाशात अचानकपणे ढग दाटून आले व विजांचा कडकडाट सुरू झाला.
वीजांपासून संरक्षण व्हावे म्हणून तिने जवळच असलेल्या नाग मंदिराचा आसरा घेतला परंतु नियतीच्या मनात मात्र वेगळेच होते. त्याच वेळेस जोराचा प्रकाश पडला व त्या विजेच्या धक्क्याने महिला गतप्राण झाली.
विजेच्या धक्क्याने मृत पावलेल्या महीलेचे नाव विजया विलास गेडाम असून अंदाजे ५२ वर्ष वयाची असल्याचे समजते.
घरातील कर्तबगार महिला विजेच्या धक्क्याने मृत्त पावल्याने परिवारावर दूखाचे डोंगर कोसळले आहे.मृत महिलेच्या वारसांना शासनातर्फे तात्काळ मदत मिळावी अशी मागणी जोर धरत आहे.