प्रितम जनबंधु
संपादक
अखील भारतीय विद्यार्थी परिषदेचे विदर्भ प्रांत मंत्री शक्ती केराम याच्या नेतृत्वात आज बुधवारी, 20 सप्टेंबर रोजी गोंडवाणा विद्यापीठात विद्यार्थ्याच्या समस्यांना घेवून आंदोलन करण्यात आले.
विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे विध्यार्थी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विद्यापीठांतर्गत येणार्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील महाविद्यालय तसेच तेथील प्रलंबित समस्यांना घेवून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विदर्भ प्रांत मंत्री शक्ती केराम यांनी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकरे यांना निवेदन दिले.
सदर निवेदनामध्ये उन्हाळी 2023 या परिक्षेच्या पुनः मुल्यांकन / साक्षांकित छायाकीत प्रतीकरिता अर्ज करण्यास मुदतवाढच्या परिपत्रकानुसार लिंक सुरु करावी. अकॅडमिक कलेंडरनुसार पीईटी परिक्षेची तारीख जाहीर करण्यात यावी. फोटोकॉपीच्या दिरंगाईमुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. यावर विद्यापीठाने आपली भुमिका स्पष्ट करावी. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे 6 सप्टेंबर 2023 चे परिपत्रक क्र. 197/2023 च्या पृष्टभुमीवर गोंडवाना विद्यापीठानेही निर्णय घेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे.
पुर्नःमुल्यांकनासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना पूर्वीच्या गुणपत्रिका पाठविण्यात आल्या, याबद्दल विद्यापीठाने स्पष्टीकरण द्यावे. तसेच अशा सर्व विद्यार्थ्यांना त्वरीत सुधारित गुणपत्रिका पाठविण्यात यावे. पुर्न: मुल्यांकनात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे पुर्नमुल्यांकन शुल्क परत करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे.
विद्यापीठ प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून अभाविपने केली आहे. यावेळी अभाविपचे विभाग संयोजक वैदेही मुडपल्लीवार, जिल्हा संयोजक हिरालाल नुटी, चंद्रपूर जिल्हा संयोजक पीयूष बनकर, ब्रम्हपुरी जिल्हा संयोजक संदेश उरकुडे यासह अभाविपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यासह विद्यापीठ क्षेत्रातील विध्यार्थी उपस्थित होते.