सावली (सुधाकर दुधे)        

             भारतीय जनता पार्टी केंद्रीय व राज्य स्तरावरील जाहीर केलेल्या सेवा पंधरवडा अभियान अतर्गत भारतीय जनता पार्टी तालुका सावली च्या वतीने आज दिनांक २०सप्टे २०२२ ला सेवा पंधरवडा चा चौथा दिवस हा आत्मनिर्भर भारत या कार्यक्रमाने शिवशक्ती अभिनव सहकारी संस्था ऊसेगाव येथे घेण्यात आला त्यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष अविनाश पाल यांनी विश्व गौरव, नवभारत चे प्रणेते, देशाचे आदरणी प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत व्यक्ति, शेतकरी गट, एनजीओ, संस्था, शेतकरी उत्पादन कंपनी, यांनी पुढाकार घेऊन योजनेचा विस्तार करावा स्वतः शेतकरी, युवकांनी उद्योजग होऊन नविन स्वदेशी उत्पादन तयार करून भारत हा देश आर्थिक महासत्ताकडे वाटचाल करण्याकरिता हातभार लावावा असे उदगार अविनाश पाल यांनी उपस्थितांना कार्यक्रमात संबोधन केलें त्यावेळी कार्यक्रमाला उपस्थित भाजपा सावली तालुका अध्यक्ष तथा भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष अविनाश पाल,महामंत्री तथा नगरसेवक सतिश बोंमवार, माजी जिहा परिषद सदस्य योगिता डबले, माजी पंचायत समिती सभापती छायाताई शेंडे, अरुण पाल अध्यक्ष शिवशक्ती अभिनव सहकारी संस्था, सचिव घनश्याम आभारे, अशोक नागापुरे, राकेश गोलेपल्लिवार ,दिलीप चुधरी, शरद ठुसे, देविदास ठुसे, मनोहर ठुसे, संतोष गोहणे, क्षितीज आभारे, श्रावण बर्लावार,चांगदेव पाल, मुसदिवार,मशाखेत्री, गजानन हजारे,जवादे,आशा भोयर,लोणारे, रोहणकर इत्यादी शेतकरी,कार्यकर्ते उपस्थित होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com