सावली (सुधाकर दुधे)
सावली तालुक्यातील बेलगाव येथील सरपंच अंबादास पाल यांचा शेतात जिवंत विद्युत करंट लागुन मृत्यु झाल्याची घटना नुकतीच घडलेली आहे.
सावली तालुक्यातील बेलगाव येथील शेतकरी तथा गावचे सरपंच अंबादास पाल हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात सकाळच्या वेळेस धानपिके पाहण्यासाठी गेले असता.त्या ठिकाणी जिवंत विद्युत तार पडुन होता, अभिनज्ञ शेतकऱ्यांचा त्याच जिवंत तारेला स्पर्श होऊन जागीच मृत्यु झाला.
सदर घटनेची माहीती गावात माहीती होताच अनेक गावक-यांना घटनास्थळा कडे धाव घेतली, तसेच घटनेची माहिती पाथरी पोलीस स्टेशनला देण्यात आली, पोलीस घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा तपास सुरू केलेला आहे, बेलगावचे सरपंच यांच्या आकस्मिक मृत्यूने कुटुंबासह गावात शोककळा पसरलेली आहे.
या परिसरात रानटी डुक्कराचा जास्त हौदास असतो व शेतपिकाचे नेहमीच रानटी डुक्कर नुकसान करत असल्याने विद्युत करंट शेतात लावल्या जातो.अशी परिसरात चर्चा सुरू आहे ,आणि या जिवंत विद्युत तारेने अनभिज्ञ सरपंचाचा बळी घेतला…..