पारशिवनी– आज 20 सप्टेंबर 2022 रोजी जवाहर नवोदय विद्यालय नवेगाव खैरी, नागपूरच्या प्रांगणात विज्ञान ज्योती प्रकल्पांतर्गत विद्यार्थी व पालकांना समुपदेशनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमांतर्गत या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य डॉ. जरीना कुरेशी यांनी. या सोबतच शाळेतील विज्ञान ज्योती प्रकल्पाचे समन्वयक अशोक कुमार, मोहित कुमार, नीलेश गजभिये, विवेक कार्लेकर आदींनीही सहभाग घेतला. लाल बहादूर शास्त्री विद्यालय, बाबुलवाडा येथिल 50 विद्यार्थीनी आणि जवाहर नवोदय विद्यालयाच्या 50विद्यार्थीनी याचा सह विद्यार्थिनींचे पालकही या सोहळ्यात सहभागी झाले होते.
भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे सुरू करण्यात आलेल्या विज्ञान ज्योती प्रकल्पाचे आयोजन जवाहर नवोदय विद्यालय समितीने केले आहे.जवाहर नवोदय विद्यालयाच्या क्रीडांगणावर आयोजित या कार्यक्रमाची सविस्तर माहिती देताना समारोह ची अध्यक्ष प्राचार्या डॉ.झरिना कुरेशी मँडम म्हणाल्या की, हा प्रकल्प प्रामुख्याने मुलींसाठी आहे, कारण केंद्र शासनाच्या या योजनेअंतर्गत मुलींना स्वावलंबी, विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि पुढे जाऊन गणिताच्या क्षेत्रात सहभागी व्हा आणि नंतर याच्या मदतीने तुम्ही केंद्र सरकारच्या या प्रकारच्या योजनांमध्ये तुमचे करिअर घडवू शकता.जवाहर नवोदय विद्यालयाच्या क्रिडांगणात दोन्ही शाळेतील100 मुली आणि त्याचे पालक यांना माहिती देवून विद्यार्थीनी व पालकांना सांगण्यात आले.