धानोरा/भाविक करमनकर 

 

धानोरा तालुक्यातिल रांगी येथे 

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत केंद्रस्तरीय क्रीडा संमेलनाचे उद्घाटन आज दिनांक 20 सप्टेंबर 2022 रोजी शशिकांत भाऊ साळवे प्रशासक कृषी उत्पन्न बाजार समिती गडचिरोली यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी निलय राठोड सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशासक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली प्रमुख अतिथी अनिल सोमनकर सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) विभाग गडचिरोली ,सौ. फालेश्वरीताई प्रदिप गेडाम सरपंच रांगी, विनायकराव किरंगे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती रांगी, देवराव कुनघाटकर सामाजिक कार्यकर्ता रांगी, डॉक्टर ताराम वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र रांगी, पी .एस .बुराडे सचिव ग्रामपंचायत रांगी,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष लक्ष्मीताई आतला आदी मान्यवर उपस्थित होते. दिनांक 20.9.2022ते 22.9.2022 तीन दिवस चालनार्या क्रीडा संमेलनात रांगी केंद्रातिल 9 शाळा सहभागी आहेत त्यात,रांगी , कुरंडीमाल, मुरमाडी ,मुरूमगाव, भाकरोंडी, जपतलाई ,सावरगाव, सोडे, परसवाडी येथील अंदाजे ६५० ते ७००खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अजय आखाडे यांनी केले ,संचालन मारोति कुनघाटकर शासकीय आश्रम शाळा रांगी, यांनी तर आभार वाणी सर यांनी मानले . कार्यक्रमाचे यशस्वी साठी क्रीडा प्रमुख सोमानकर यांचेसह केंद्रातिल सर्वच शाळेचे शिक्षक व कर्मचारी यांनी सहकार्य केले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com