सावली (सुधाकर दुधे)
मॅजिक बस इंडिया फाउंडेशन, चंद्रपूर संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व तालुका समन्वयक आकाश गेडाम यांच्या नियंत्रणात सावली तालुक्यातील 37 शाळांमध्ये वर्ग 06 ते 09 पर्यंतच्या 3843 विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी (SCALE) “खेळा द्वारे शिक्षण/जीवन कौशल्य विकास” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सदर उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संवाद कौशल्य, गटकार्य, समस्यांचे निराकरण, शिकण्यासाठी शिकणे, स्व-व्यवस्थापन इत्यादी जीवन कौशल्यांचे धडे दिले जातात तसेच शिक्षणाचे महत्व आणि लिंग समानता याबद्दल देखील सत्राच्या माध्यमातून मार्गदर्शन केल्या जात आहे..
मॅजिक बसचा उपक्रम इंदिरा गांधी विद्यालय पालेबारसा येथे मागील सहा महिन्या पासून राबविला जात असल्याने सदर उपक्रमाची पाहणी करण्या करीता मॅजिक बस संस्थेच्या दिल्ली येथील मुख्य कार्यालयातील गीतांजली दास व झोया मॅडम यांनी भेट दिली,व पालेबारसा शाळेत व गावात राबविण्यात येत असणाऱ्या SCALE कार्यक्रमा बाबत शाळा व गावाचे मत जाणून घेणे आणि उपक्रम अधिक यशस्वीरीत्या राबविला जाण्यासाठी योजना तयार करणे,याची माहीती दिली.
गीतांजली दास यांनी पालकांशी चर्चा केली व उपक्रमा बाबत पालकांचे,गावकरीचे मत जाणून घेतले. चर्चे अंती मॅजिक बस उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे व हा उपक्रम आमच्या शाळेत व गावात सतत सुरू असावा अशी अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली.
दिल्लीतील अधिका-यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, यावेळी सरपंच मंदा मडावी, ग्रामपंचायत पालेबारसा उपसरपंच. सुरेश खेडेकर , लोखंडे सर मुख्याध्यापक इंदिरागांधी विद्यालय शाळेतील सर्व ,शिक्षकवृंद व गावातील प्रतिष्ठित नागरिक व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
सदर कार्यक्रम शाळा सहायक अधिकारी कु. श्रद्धा नागमोते. मंगेश रामटेके, निशा उमर्गुंडावार व समुदाय समन्वयक कु. विश्रांती पेंदाम व सौ. रीना चीमुरकार यांच्या अथक परिश्रमाने यशस्वीरित्या पार पडला.