प्रेम गावंडे
उपसंपादक
दाखल न्युज भारत
चंद्रपूर जिल्हा हॉकी असोसिएशन ची वार्षिक आढावा बैठक दिनांक 18:09:2022 रोजी चांदा क्लब येथे संपन्न झाली. या सभेमध्ये प्रामुख्याने हॉकी इंडिया ने विदर्भ हॉकी असोसिएशन ला बरखास्त करून एक स्टेट एक असोसिएशन सांगत हॉकी महाराष्ट्र ला परवानगी दिली त्याचा विरोधात विदर्भातील 11 जिल्हे कोर्टात लढाई लढत असून आम्ही विदर्भ असोसिएशन सोबत आहे आणि राहणार अशे हा सभेत सर्वमताने ठरवण्यात आले.
तसेच नोव्हेबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये जिल्हा स्तरीय हॉकी स्पर्धाचे आयोजन करण्याचा सुद्धा निर्णय घेण्यात आला.
ही बैठक डॉ. किर्तीवर्धन दीक्षित अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा हॉकी असोसिएशन यांचा अध्यक्षतेखाली घेण्यात आली या बैठकीत चंद्रपूर जिल्हा हॉकी असोसिएशनचे सचिव समीर खान पठाण, माजी सचिव बॉबी दीक्षित, सहसचिव रुपेश सिंग चव्हाण, बबन शेख, अब्दुल रहमान सागर, मधुकर जुमडे, प्रभाकर तोगर, संदीप वैरागडे, अज्जू भाऊ आणि प्रेम गावंडे प्रामुख्याने उपस्थित होते.