कमलसिंह यादव
प्रतिनिधी
पारशिवनी:- ( सं) तालुकात एकुण 8 जनावरांमध्ये लम्पी रोगाचे चिन्ह आढळून आले आहेत.लम्पी आजाराचा विळखा आता अनेक जणावरांवर दिसत असल्याचे पहायला मिळत आहे.यामुळे पारशिवनी तालुक्यातील संबंधित सर्व अधिकारी दक्ष झाले असून लम्पी आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत.
आता पर्यत पारशिवनी तालुक्यातील साटक गावात दोन व बखारी गावात दोन जणावरांना लम्पीची लागवड झाल्याचे निदर्शनास आले होते.मात्र आजच्या तपासणीत कान्हादेवी टेकाडी येथे दोन बैल व काद्री येथे दोन गाईना लंम्पीचे लक्षण आढळून आले आहेत.यामुळे प्रशासनाने खबरदारी उपाय सुरू केले.
बाधित जनावरे मिळालेल्या भागातील बखारी, वाघोड, नांदगांव, मेहंदी, गरंडा गवना, साटक, निमखेडा, डुमरी कला, बेलडोगरी, या गावत शुक्रवार,शनिवार व रविवार पर्यत 3530 गाई व बैलाचे लशीकरण करण्यात आले.आज सोमवारी 60 गोठ्यात फवारणी करण्यात आले असून एकुण 1050 गाईबैलाचे कोठ्यांची फवारणी करण्यात आली आहे.
काल तपासणी व फवारणीची मोहीम कांद्रीगावात व कान्हादेवी टेकाडी येथे करण्यात आली असून कान्हादेवी टेकाडी ऐकून दोन बैल व कांद्री येथे दोन गाईना लम्पी आजाराचे लक्षण आढळुन आले असून त्याचे संपल तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.मंगलवारला कान्हादेवी,टेकाडी आणी कांद्री येथे लशिकरण करण्यात येणार अशी माहीती तालुका पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश ठाकुर यांनी दिली.
जिल्ह्याचे,तालुक्याचे पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी संबंधित शेतकर्यांकडे पोहोचले आहेत.प्रतिबंधात्मक उपाय तालुक्यात सुरू असून आजाराची तीव्रता अधिक नाही.यामुळे शेतकर्यांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे त्यांना सांगितले.
यापूर्वी पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आलेल्या नमुन्यांचा अद्यापही अहवाल प्रतीक्षेत असून,तो अहवाल हाती येताच या जनावरांना लम्पीचीच लागण झाली आहे की इतर आजाराची हे स्पष्ट होणार असल्याचे पशुसंवर्धन तालुका अधिकारी डाक्टर गणेश ठाकुर यांनी सांगितले.
पारशिवनी तालुक्यातील जिं प सदस्य पं. स सदस्य व सरपंच यांनी शेतकऱ्यानी जनावरातील लंपी व्हायरस आजाराने घाबरू नये असे आवाहन केले आहे.तसेच तालुक्यातील पशुवैधकिय अधिकारी डॉ. गणेश ठाकुर कन्हान विभागातील डॉ. प्रिती वाळके सह पारशिवनी तालुका व कन्हान विभागातील पुर्ण टिम तसेच अधिकारी कर्मचारी हजर राहणार आहे.
आवश्यक तेथे फवारणी व लशीकरण करण्यात येणार आहे असी माहीती तालुका पशुवैधकिय अधिकारी डॉक्टर गणेश ठाकुर कन्हान विभागातिल डॉ. प्रिती वाळके यांनी माहीती दिली.