कमलसिंह यादव 

प्रतिनिधी

 

पारशिवनी==-पो.स्टे . कन्हान च्या अंतर्गत १ कि.मी. अंतरावरील एस.बी.आयचे ए.टी.एम कन्हान येथे आहे.या एटीएम मधून पुंडलिक केशवराव इंगोले रुपये काढण्यासाठी गेले असता,एका अनोळखी इसमाने हातचालाखीने त्यांच्याकडून एटीएम घेऊन ७४ हजार रुपये काढले व क्षणाचा विलंब न करता पोबारा केला.

        तक्रारदार – पुंडलीक केशवराव इंगोले,वय ६३ वर्ष , रा वार्ड नं .४ श्रीकृष्ण मंदीरचे जवळ टेकाडी कन्हान,ता.पारशिवनी डब्लु.सि.एल हे आपले पत्नीसह नागपुरला जात असता कन्हान येथीन एस.बी.आयचे ए.टी.एम मधुन रुपये काढण्याकरीता गेले असता ए.टी.एम. मध्ये असलेल्या अज्ञात आरोपीने तक्रारदारा जवळील ए.टी.एम.कार्ड हातचलाखीने घेवुन गेला.तक्रारदार इंगोलेने बाहेर येवुन आरोपीचा शोध घेतला असता सदर इसम दिसून आला नाही. 

       त्यानंतर इंगोलेच्या मोबाईल वर मॅसेज आला की,आपल्या खात्यातुन ७४,हजार रुपये डेबीट झाले आहेत.

          तक्रारकर्त्यांनी

त्यांचा पुतन्याला घटनास्थळी बोलवुन हकीकत सांगीतले असता फिर्यादीच्या पुतन्याने ए.टी.एम कार्ड ब्लॉक केले. पुंडलिक इंगोले यांच्या एटीएम द्रारे ७४ हजार रुपये काढुन घेत फिर्यादीची फसवणुक केली आहे.सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्ट वरुन पो.स्टे .कन्हान येथे आरोपीविरुध्द कलम ४२० भादंवि अन्वये गुन्हा नोंद केला आहे.सदर गुन्ह्यान्वये आरोपीचा शोध घेणे सुरु आहे . 

     गुन्ह्याचा पुढील तपास पोहवा प्रशांत रामटेके हे करीत आहे . .

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com