नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली: दिनांक १९ जानेवारी २०२२ ला झालेल्या जि. प. व पं.स. सार्वत्रिक निवडणुकी करिता तीन दिवस भाड्याने लावण्यात आलेल्या चार वाहनांचे पैसे अजूनही निवडणूक आयोगाने दिले नसल्याने वाहन चालक मालकावर उपासमारीची पाळी आली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीच्या कामाकरिता दिनांक १६ जानेवारी २०२२ ते १८ जानेवारी २०२२ पर्यंत एकूण तीन दिवस चार खाजगी वाहन (जीप)निवडणुकीच्या कामाकरिता तहसील कार्यालय साकोली येथे भाडेतत्त्वावर किरायाने घेतलेले होते.
सदर निवडणूक प्रक्रिया दिनांक १८जानेवारी २०२२ ला पूर्ण झालेली आहे परंतु जवळपास ७ ते ८ महिन्यापासून किरायाने घेतलेल्या खाजगी वाहनाचे भाडे अजून पर्यंत मिळालेले नाही.त्यामुळे वाहन चालक मालकावर उपासमारीची वेळ आली आहे.
साकोलीचे तहसीलदार यांना विचारणा केली असता बिल पाठविले आहेत पैसे आल्यानंतर तुम्हाला फोन करू अशी आश्वासने वारंवार देतात.यासाठी निवडणुकीच्या कामाकरिता भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या चार खाजगी वाहनांचे भाडे लवकरात लवकर देण्यात यावे अन्यथा तहसील कार्यालय समोर उपोषण करू असा इशारा वाहन चालक मालकांनी दिला आहे.