कूरखेडा येथे लाडक्या बहिणीनी औक्षण करीत बांधल्या पोलीस दादांना राख्या.. 

     राकेश चव्हाण 

कूरखेडा तालुका प्रतिनिधी 

         बहिन भावाचा प्रेम वृध्दिगत करणारा पर्व म्हणजेच रक्षा बंधन या निमीत्य येथील लाडक्या बहिणीनी पोलीस स्टेशन कूरखेडा येथे आज दि १९ आगस्ट सोमवार रोजी सांयकाळी ५ वाजता पोहचत पोलीस दादाना राख्या बांधत त्यांचाकडून सूरक्षेची हमी घेतली.

          पोलीस स्टेशन येथे आयोजित कार्यक्रमात महिला भगिनीना पारंपरिक पध्दतीने औक्षवंत व तिलक करीत त्याना मोठ्या आस्थेने उपस्थीत सर्व पोलीस बांधवाना राख्या बांधल्या व त्यांचा कडून शहरातील शांतता व सूव्यवस्था कायम राखत महिला सूरक्षेची हमी घेतली.

            यावेळी ठाणेदार महेन्द्र वाघ,पोलीस उपनिरीक्षक दयानंद भोंबे, पोलीस उपनिरीक्षक हिरामन गायकवाड़ तसेच भाजपा महिला जिल्हा उपाध्यक्ष रूपाली कावळे, जिल्हा सचिव शितल लांजेवार, सहसचिव रंजू मेश्राम,शोभा दहिकर,रेखा रामटेके, किर्ति बगमारे,शोभा दहिकर,वच्छला कसारे,पूष्पा सोरते, संगीता मडावी,आशा जांभूळकर तसेच पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थीत होते.