रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधि
चिमूर :- स्थनिक गांधी सेवा शिक्षण समिती द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचे माजी युवा पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या 80 व्या जयंतीनिमित सदभावना दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ.प्रफुल्ल बन्सोड होते. त्यांनी आपल्या मार्गदशनात भारताला सुपर पॉवर बनाविण्यात माजी पंतप्रधान राजीव गांधीचे देशाप्रतीचे योगदान न विसरण्या सारखे आहे. तसेच कारगिल युध्दात भारताला विजय मिळवून देण्यात वादग्रस्त बोर्फास तोफाची कामगिरी उत्तम होती. असे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी विद्यार्थ्याना शपथ देण्यात आली. या कार्यक्रमाला डॉ. कार्तिक पाटील, डॉ.हरेश गजभिये प्रा.पितांबर पिसे रा से यो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.प्रफुल राजुरवाडे प्रा.डॉ. नितिन कत्रोजवार प्रा.डॉ. कामडी, प्रा. प्रविण वाकडे,प्रा.वर्षा सोनटक्के ,प्रा.रुपाली भरडे,प्रा.चेतन चौधरी, प्रा.शितल वानखेडे उपस्थित होते.
सूत्रसंचालन विद्यार्थी विकास विभागाचे प्रा. डॉ. राजेश्वर राहागंडाले यांनी केले. आभार शारिरिक शिक्षण व क्रिडा विभागाचे संचालक प्रा. डॉ.उदय मेंडूलकर यांनी मानले. या कार्यकमाला विद्यार्थ्यानी उत्तम प्रतिसाद दिला.