साकोली भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन… — 60 पेक्षा जास्त नामांकित कंपन्या होणार सहभाग…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्युज भारत

साकोली : येथील वैनगंगा शारीरिक शिक्षण परिसरात करंजेकर कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट साकोली व कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नवप्रक्रम भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 21 ऑगस्टला सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.

        या रोजगार मेळाव्यात 60 पेक्षा जास्त नामांकित कंपन्यांचा सहभाग असून रोजगार मेळाव्याचे आयोजक डॉक्टर सोमदत्त करंजेकर यांनी सांगितले की या मेळाव्यात अकाउंटंट, डिजिटल मार्केटिंग ,आयटी इन्फ्रा सर्विसेस ,डाटा एन्ट्री फार्मा कलेक्शन बॉय, सेल्स व मार्केटिंग, बीपीओ नेट डेव्हलपर अशा विविध क्षेत्रातील नोकऱ्यांची संधी उपलब्ध होणार आहे.

         जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात असलेल्या रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच नामांकित उद्योजकांच्या थेट नोकरी इच्छुक उमेदवारांशी संपर्क करण्याच्या दृष्टीने मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे.

        या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तिन हजार पेक्षा जास्त पॅकेज च्या पदे भरण्यात येणार असून विविध नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत मेळाव्यात सहभागी होणारे उमेदवारांनी आधार कार्ड शैक्षणिक प्रमाणपत्राच्या छायांकित प्रती सोबत ठेवाव्यात एस एस सी ,एच एस सी, आयटीआय डिप्लोमा इंजिनिअर, पदवी इंजिनियर, बीएससी, व इतर पदवीधारक नोकरी इच्छुक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखती द्वारे निवड केली जाणार आहे.

         जिल्ह्यातील जास्त बेरोजगार उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक डॉ सोमदत्त करंजेकर यांनी केला आहे.