ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्युज भारत…
साकोली :- वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था साकोलीचे अध्यक्ष व भारतीय जनता पक्षाचे नेते डॉ. सोमदत्त करंजेकर यांच्या द्वारे आयोजित तालुकास्तरीय भव्य भजन स्पर्धा चे उद्घाटन साकोली येथील भारत सभागृहात शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट ला सकाळी अकरा वाजता तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेशजी बैस यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संतोष कोरे, प्रशांत शिवणकर, चेतक हत्तीमारे, सुनिल जगिया, सुदाम हटवार उपस्थित होते.
या स्पर्धेत एकूण ९१ भजनी मंडळांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत दररोज तीन क्रमांक देण्यात आले सोबतच उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट गायिका, उत्कृष्ट तबलावादक, उत्कृष्ट हार्मोनियम वादक, असे बक्षीसही देण्यात आले.
सहभागी मंडळांना मानपत्र व रोख मान्यवरांच्या हस्ते देऊन सम्मानित करण्यात आले. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी डॉ. सोमदत्त करंजेकर म्हणाले भजन मंडळातील कलाकारांना व्यासपीठ मिळावे यासोबतच भजनांच्या माध्यमातून गावातील वातावरण चैतन्यमय राहते. सत्संग आपल्या समाज मनाचा आधार आहे.
अध्यात्मिक उन्नती, सामाजिक समरसता, व समाज संघटन यासाठी भजन हे सर्वोत्तम साधन आहे व समाजमन चैतन्यमय राहावे या हेतूने या भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेतील संपुर्ण भजन मंडळांना व मंडळातील सदस्यांना मानपत्र, प्रमाणपत्र व रोख पारितोषिके देण्यात आली या स्पर्धेचे परीक्षण प्रसिफ कलावंत भावेश कोटांगले, प्रा. संजय निंबेकर आणि दामोदर सेलोकर यांनी केले. स्पर्धेमध्ये संपुर्ण साकोली तालुक्यातील भजन मंडळानी सहभाग घेतला.
या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून स्पर्धार्थी मंडळांना शुभेच्छा दिल्या. यामध्ये माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते, भाजपा तालुकाध्यक्ष अमोल हलमारे, भाजपा शहर अध्यक्ष नितीन खेडीकर, सेंदुरवाफा शहराध्यक्ष शंकर हातझाडे, भाजपा महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा कल्याणीताई भुरे, तालुका भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा भूमिका धकाते, भाजपा शहर मोर्चा अध्यक्ष गीता बोरकर, प्रीती डोंगरवार, भाजप प्रदेश कार्यकारी सदस्य रेखाताई भाजीपाले, महिला मोर्चा महामंत्री कल्पना कापगते, भाजपा जिल्हा सचिव मनीष कापगते, जिल्हा सचिव डॉ. विजया नंदुरकर, जि. प. सदस्या माहेश्वरीताई नेवारे, जि. प. सदस्या वनीताताई डोये, भाजपा शहर महामंत्री प्रदीप गोमासे, जमनापूरच्या सरपंचा पूजा देशमुख, सरपंच उषाताई डोंगरवार, सरपंच संजय खोब्रागडे ,माजी नगराध्यक्ष धनवंताताई राऊत, माजी नगरसेविका अनिता पोगडे, माजी नगरसेविका राजश्री मुंगमोडे, माजी पंचायत समिती उपसभापती श्रावण बोरकर, माजी नगरसेवक रवी परशुरामकर, विहिंप जिल्हाध्यक्ष भंडारा जॅकी रावलानी, जयसिंगजी नान्हे, जिल्हा महामंत्री विहिंप डॉ.राकेश सेलोकर,माजी सरपंच श्रीराम रुखमोडे, माजी सरपंच हुसेन कापगते, डॉ. शकुंतला कापगते, वैजंता कापगते, डॉ. राजकुमार समरीत, हर्षल कापगते, पद्माकर बोरकर, इंद्रायणी कापगते, भीमावतीताई पटले, माजी सरपंच आशाताई शेंडे, रामूजी लांजेवार, विनोद मुरकुटे, देवनाथ राहांगडाले, नितीन निर्वाण, फुलेश्वर चवडे महाराज, प्रफुल देशमुख, ताराचंदजी लंजे, प्रफुल वडवाईक, मंगेश कापगते, प्रणय बडवाईक, पंकज भिवगडे, रवींद्र चाचेरे, स्वप्निल तिघरे, पुरुषोत्तम तीघरे, अमित बडवाईक तसेच भाजपचे, विहिंप व बजरंग दलचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.