संजय टेंभुर्णे
कार्यकारी संपादक
दखल न्यूज भारत
राज्य शासनाची अतिशय नावाजलेली पुणे येथील अंगीकृृृत प्रशिक्षण संस्था यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी अर्थात यशदा येथे राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत राज्यातील व विदर्भातील सरपंचांसाठी आयोजित केल्या जाणार्या प्रशिक्षण कार्यक्रमांतील प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम दि.१५ ते १७ जुलै २०२४ या दरम्यान आयोजित करण्यात आले होते.
प्रशिक्षणामध्ये ‘नागपूर विभागातील शाश्वत शेती:समृृृृद्ध शेती’ या विषयावर पीपीटी व अन्य साधनांद्वारे दि.१७ जुलै रोजी प्रशिक्षणार्थीना मोलाचे मार्गदर्शन करण्यासाठी परसोडी जि.प.क्षेत्राअंतर्गत येणार्या परसोडी पंचायत समितीचे सदस्य व लवारी येथील नवोपक्रमशील युवा शेतकरी अनिल शिवलाल किरणापूरे यांना आमंत्रीत करण्यात आले होते.
एक तासाच्या या प्रशिक्षण सत्रात भाऊसाहेब बहिराट सत्र संचालक राज्य ग्रामीण विकास संस्था यांच्या मार्गदर्शनात अनिल किरणापूरे यांना सत्र घेण्याची संधी मिळाली. या प्रशिक्षणात सर्व विदर्भातील प्रशिक्षक उपस्थित होते.
हे प्रशिक्षक गाव पातळीवर सरपंचांना व ग्रामपंचायत सदस्यांना प्रशिक्षण देणार आहेत.ग्रामीण भागातील एका साध्या शेतकर्याला त्यांनी आपल्या शेतात राबविलेल्या विविध प्रयोगांची माहिती प्रशिक्षकांना देण्याची संधी मिळाली याबद्दल अनिल किरणापूरे यांचे अभिनंदन केले जात आहे.