रामदास ठूसे
विशेष विभागीय प्रतिनिधि
चंद्रपूर : – ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत असलेल्या संपुर्ण समस्यांचा निपटारा करण्याकरिता बफर, कोर व प्रादेशिक स्तरावर तक्रार निवारण समिती स्थापन करण्याबाबतचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर यांना वने,सांस्कृतिक कार्ये तसेच मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्र पाठविले असून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात नेहमीच विविध समस्या घडत असतात.
त्याबाबत याची कुठेतरी दखल घेतली जावी म्हणून तक्रार निवारण समिती स्थापन करून समस्या सोडविल्या जातील अशी आशा व्याघ्र प्रकल्पालगत येत असलेल्या ग्रामस्थांकडून बाळगली जात आहे.