युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
आज दिनांक 20/7/2024 ला स्व.महामहिम दादासाहेब गवई यांच्या पुण्यतिथी निमित्य रामकृष्ण कनिष्ठ महाविद्यालय, दारापूर,प्रा.आ.केंद्र चंद्रपूर, ता.दर्यापूर येथे आरोग्य निदान शिबीर घेण्यात आलेत.
यात 100 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, सिकल सेल तपासणी, व रक्त तपासण्या करण्यात आल्या. तसेच साथरोग बद्दल तसेच आहाराबद्दल मार्गदर्शन डॉ.स्वाती जामनिक वै.अ. प्रा.आ.केंद्र, चंद्रपूर यानी केले.
यावेळी दादासाहेब गवई चरिटेबलं ट्रस्ट चे सचिव पी.र. एस. राव ,काजलताई धंदर सरपंच दारापूर, .मल्लू पडवाल प्राचार्य तसेच मोरशे मॅडम प्राचार्य,अमित वानखडे प्राद्यापक, तसेच प्रा.आ.केंद्र, चंद्रपूर येथील सर्व टीम उपस्थित होती.
त्यामध्ये संकेत चव्हाण, अनिल एकडे, (सि एच ओ ), सौ. संगीता गावंडे, श्रीमती बेलसरे, लांडे, कैलास कडू, तसेच आशा वर्कर तसेच एच एल एल टीम उपस्थित होती.