शिष्याने अहंकार सोडावा :- डॉ. स्वाती मुंडले 

   चेतक हत्तीमारे 

जिल्हा प्रतिनिधि भंडारा 

          स्थानिक समर्थ महाविद्यालय लाखनी येथे, आज 20 जुलै 2024 रोजी सांस्कृतिक विभागाच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

          या कार्यक्रमाला प्रमुख वक्त्या म्हणून डॉ.स्वाती मुंडले आणि अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिगांबर कापसे व डॉ.धनंजय गिरेपुंजे, डॉ.संगीता हाडगे आणि प्रा.पद्मजा कुळकर्णी प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.

         डॉ.स्वाती मुंडले यांनी आपल्या मार्गदर्शनात गुरु पौर्णिमा उत्सव भारतीय संस्कृती प्रमुख उत्सव असून गुरुपौर्णिमा उत्सवापासूनच आपल्या सण आणि उत्सवाची सुरुवात होते. पौर्णिमा म्हणजे काय तर पूर्णत्व चंद्राला सुद्धा पौर्णिमा म्हणजे पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी पंधरा दिवस साधना करावी लागते. तेव्हा आपल्याला पूर्ण चंद्र बघायला मिळते, अनुभवायला मिळते. या मागची तपश्चर्या, साधना ही महत्त्वाची आहे. तुम्हाला सुद्धा स्नातक ही पदवी मिळवण्यासाठी पंधरा वर्षे तपश्चर्या, साधना, अभ्यास करावा लागतो. तेव्हा तुम्हाला ही पदवी मिळत असते असे कार्यक्रमादरम्यान त्या बोलत होत्या.

         गुरुचे कार्य काय? गुरुची महती काय आहे? गुरु आपल्याला आपल्या अहंकारापासून दूर ठेवतो असे गुरुचे महत्व या गुरु पौर्णिमेच्या उत्सवाच्या निमित्ताने अतिशय महत्त्वाचे आहे. गुरु आणि शिष्यांच्या हा सोहळा आहे असे आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे कार्यक्रमादरम्यान बोलत होते.

         कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. संगीता हाडगे, संचालन प्रा रूपाली खेडीकर आणि आभार प्रा.शितल कोमेजवार यांनी मानले.