ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्युज भारत
साकोली – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत भंडारा जिल्ह्यातील मजुरांची कामाची मजुरी एप्रिल 2024 ते जून 2024 पर्यंत ची रक्कम थकीत आहे.
ही मजुरी त्वरित मिळावी यासाठी वैनगंगा बहुउद्देशीय शिक्षण संस्था साकोली चे अध्यक्ष डॉ.सोमदत्त करंजेकर यांनी दिनांक 19 जुलैला रोजगार हमी योजने महाराष्ट्र राज्य मुंबई मंत्रालयाचे उपसचिव जे.जे.वळवी यांना मुंबई येथे निवेदन दिले मजुरांच्या खात्यात त्वरित रक्कम जमा करावी अशी मागणी निवेदनातून केली आहे.
यावेळी रोजगार हमी योजना महाराष्ट्र राज्य उपसचिव जे.जे.वळवी यांनी पंधरा दिवसाच्या आत मजुरी जमा करण्याचे आश्वासन दिले.
वैनगंगा बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सोमदत्त करंजेकर करंजेकर यांनी उपसचिव वळवी यांच्यासोबतच उपसंचालक संजना खोपडे अधिकारी अमित दळवी यांच्यासोबत सकारात्मक चर्चा करून या मागणीची मजुरी पंधरा दिवसाच्या आत देण्याचे आश्वासन दिल्यामुळे भंडारा जिल्ह्यातील मजुरांनी डॉ.सोमदत्त करंजेकर यांचे आभार मानले आहे.