प्रभाग क्र.बारा मध्ये राहत्या घराची पडझड… — घरकुलाचा लाभ मिळेना? — जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष!…

   राकेश चव्हाण 

तालुका प्रतिनिधी कुरखेडा 

     कुरखेडा येथे काल रात्रो आलेल्या पाऊसामुळे प्रभाग क्र.बारा मधील रहिवासी राजेंद्र भोजराज चौव्हाण यांचे जुन्या राहते घराची भिंत कोसळली,रात्रो ला घटना घडली त्या वेळी घरातील सदस्य बाजुच्या खोलीत झोपले असल्याने कोणतीही जीवीत हानी झाली नाही,परंतू वित्तीय हानी झाली आहे.

         सदर परिवार मागील चाळीस ते पन्नास वर्षा पासून कुरखेडा येथे वास्तव्य करीत आहे.घरकुलं योजने अंतर्गत घर मिळावे करीता तत्कालीन ग्रामपंचायत,सध्या नगरपंचायत ला अर्ज सादर केला.परंतु शासन स्तरावर मिळणाऱ्या घरकुल करीता अटी-शर्तीमुळे अर्धाहून जास्त कुटुंब वंचित राहिले आहेत.

           कुरखेडा येथील बहुतेक भाग वनविभागाच्या जमीनीवर असल्याने,वनजमीनीचे पट्टे नसल्याने त्यांना पी.एम. आवास,घरकुल योजनेचा लाभ मिळणे शक्य नाही. 

       कुरखेडा येथील नगरपंचायत पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांची भेट घेत परिस्थिती निदर्शनास आणून दिली व कुरखेडा येथील नगरपंचायत अंतर्गत वन विभागाच्या जमीनीवर वास्तव्य करणाऱ्या कुटुंबीयांना घरकुल योजनेत सामावुन घ्यावे असी मागणी केली.

      सध्या झालेल्या नुकसानीचे पंचनामा करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शासनास केली आहे.