वर्धा शहरात जीव घेणे खड्डे त्वरित दुरुस्त करा.. — महात्मा फुले समता परिषदेची मागणी..

     रोहन आदेवार 

जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ 

साहाय्यक जिल्हा प्रतिनिधी वर्धा..

          वर्धा शहरात जीवघेणे खड्डे पडले आहे.त्या ठिकाणी रोज अपघात होत आहे.त्या खड्ड्यामय रस्त्यावर पायदळ चालणे अवघड झाले असून वर्धा शहरात बॅचलर रोड वरील शास्त्री चौक ते पावडे चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जेल रोड पर्यंत,कृषी उत्पन्न बाजार समिती वर्धेच्या गेट समोर तसेच वर्धा शहरात अनेक ठिकाणी पहिल्याच पावसात मोठ्या प्रमाणात खड्डे तयार झाले आहेत.

        त्यावर त्वरित दुरुस्ती करावी,अशा मागणीचे निवेदन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा संघटक विनय डहाके यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. 

        याप्रसंगी निळकंठ पिसे,सुधाकर मेहरे,संदीप चिचाटे,गजेंद्र सरकार,पुंडलिक नाकतोडे,भरत चौधरी,रोहिणीताई पाटील,मंगेश भोंगाडे,विशाल हजारे,बंटी खडसे,अमोल ठाकरे,गुणवंत डफरे,नरेंद्र चरजन,वासुदेवराव ढमणे,मदन घिमे,सुरेश फुलकर,मनोहर डांगे व इत्यादी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.