प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी
चिमूर तालुक्यात काल रात्री पासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने,राजीव गांधी नगर,माणिक नगर,क्रांती नगर,सरकारी दवाखान्या मागील भागात पाणी शिरल्याने मार्ग बंद झाले होते व वाहतूक ठप्प झाली होती.यामुळे नागरिकांचे जनजिवन विस्कळीत झाले होते.
मुसळधार पावसाच्या पाण्यामुळे उमा नदीला पूर आल्याने नदीकाठील शेतातील सोयाबीन,तूर,कपास शेत पिकांचे शेतकऱ्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.
चिमूर शहरातील काही नागरिकाच्या घरात पाणी शिरल्याने जिवनावश्यक वस्तूचे नुकसान झाले आहे.दरम्यान चिमूर शहर कॉग्रेस पक्षाचे पदाधिकारी,शहराध्यक्ष अविनाश अगडे,माजी नगरसेवक विनोद ढाकुनकर,खासदार डॉ. नामदेव किरसान यांचे स्वीय सहाय्यक राजू चौधरी,न.प.माजी बांधकाम सभापती नितीन कटारे,मिडिया प्रमुख पप्पू भाई शेख,विधान सभा उपाध्यक्ष मंगेश घ्यार,प्रविण मोदी,अक्षय लांजेवार,अक्षय नागरीकर,प्रदिप साटोने,अमीत मोदी,पुराची पाहणी करीत काही मदत लागल्यास तालुका कॉग्रेस कमिटी सदैव तत्पर असणार असे आव्हान त्यांनी नागरिकांना केले आहे.
चिमूर तालुक्यात झालेल्या अतीवृष्टीने सर्व नदी-नाले पाण्याने ओसंडून वाहत आहेत.यामुळे रस्ते ओलांडतांना योग्य खबरदारी घ्यावी,असे आव्हान पोलीस विभागाकडून व इतर सर्व प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मौजा कोटगावच्या सभोवताल नदीचा वेढा असल्याने या गावातील नागरिकांना नेहमी पुराचा फटका बसतो आहे व जनसंपर्क तुटतो आहे.जांभुळघाट ते कोटगाव नदीवर पुलाचे बांधकाम करावे यासाठी आमदार किर्तीकुमार भांगडीया यांना निवेदन देण्यात आले होते.मात्र त्यांनी कोटगाव नागरिकांच्या रास्त मागणीकडे दुर्लक्ष केले.
याचबरोबर चिमूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते.त्यांनी सुध्दा कोटगाव नदीवर पुलाचे बांधकाम संबंधाने गांभीर्याने लक्ष दिले नाही.
खरबो रुपयांचे कामे चिमूर विधानसभा क्षेत्रात आणलो म्हणारे आमदार किर्तीकुमार भांगडिया,कोटगावच्या नदीवर साधा पुल बनविण्यासाठी असमर्थ ठरतात,याला काय म्हणावे?
अतिदुर्गम कोटगावच्या नागरिकांना आवागमन करण्यासाठी पुल आवश्यक असताना,लोकप्रतिनिधींचे वारंवार होणारे दुर्लक्ष कोणत्या कर्तव्यात मोडते हे प्रामुख्याने स्पष्ट झालेले बरे!